शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

कर वसुली ६० टक्क्यांवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:44 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता व पाणीपट्टी कराची ९० टक्के वसुली झाली पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन विशेष पथक गठीत करण्यात आले असून कर वसुलीची कार्यवाही जोमात सुरू आहे.

ठळक मुद्देपालिकेकडून शहरात जप्ती कारवाई सुरू : उद्दिष्ट गाठण्यासाठी कर विभागाचे पथक लागले कामाला

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता व पाणीपट्टी कराची ९० टक्के वसुली झाली पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन विशेष पथक गठीत करण्यात आले असून कर वसुलीची कार्यवाही जोमात सुरू आहे. गडचिरोली पालिकेची मालमत्ता कर वसुली ६० टक्क्यावर पोहोचली आहे.गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दित सर्व २५ वार्ड मिळून एकूण ११ हजार ५७६ मालमत्ता करधारक आहेत. शहराची लोकसंख्या जवळपास ५४ हजार आहे.गडचिरोली पालिकेची जुनी थकबाकी व सन २०१८-१९ या चालू वर्षातील कर वसुली सुरू आहे. मालमत्ता करापोटी गडचिरोलीवासीयांकडे ८४ लाख ५२ हजार ३४४ इतकी जुनी थकबाकी आहे. सन २०१८-१९ या चालू वर्षाची १ कोटी ८० लाख ३४ हजार ३२६ रुपये आहे. दोन्ही मिळून एकूण २ कोटी ६४ लाख ८६ हजार ६७० रुपये इतक्या मालमत्ता कराची मागणी आहे. यापैकी आतापर्यंत १ कोटी ५८ लाख ९६ हजार ५६५ इतकी वसुली झाली असून याची टक्केवारी ६०.०२ आहे. आता मालमत्ताधारकांकडे १ कोटी ११ लाख ३ हजार ८५३ रुपये शिल्लक आहेत.पाणीपट्टी करापैकी २९ लाख ५५ हजार १२३ इतकी जुनी थकबाकी व चालू वर्षाची ७९ लाख २६ हजार ७६६ रुपये असे एकूण १ कोटी ८ लाख ८१ हजार ८८९ रुपये इतकी मागणी आहे. यापैकी जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण ५७ लाख ७३ हजार ५०७ रुपये इतकी वसुली आतापर्यंत झाली आहे. सदर पाणीपट्टी कर वसुलीची टक्केवारी ५३.०६ आहे.याशिवाय पालिकेच्या वतीने नागरिकांकडून शिक्षण उपकर, रोहयो उपकर व वृक्षकराचीही वसुली केली जात आहे. सदर तिन्ही प्रकारचे कर हे मालमत्ता करामध्ये समाविष्ट आहेत.शिक्षण उपकरापोटी जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ४७ लाख ५९ हजार ५१ रुपयांची मागणी आहे. यापैकी आतापर्यंत ३१ लाख ९८ हजार ६९४ रुपये इतकी वसुली झाली आहे. या कर वसुलीची टक्केवारी ६७.२१ आहे. रोहयो उपकरापोटी ४ लाख २७ हजार ६०७ रुपये इतकी मागणी आहे. यापैकी २ लाख ४५ हजार ९५२ रुपयाची वसुली झाली आहे. आणखी १ लाख ८१ हजार ६५५ इतके रोहयो उपकर व १ लाख ५६ हजार ३५७ इतक्या शिक्षण उपकराची वसुली शिल्लक आहे.दुकान गाळे भाड्याचे पाच लाख शिल्लकगडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या मालकीचे शहराच्या विविध भागात एकूण ८० दुकान गाळे आहेत. नेहरू संकूल, बेसीक शाळेजवळ, आयटीआय चौक तसेच आठवडी बाजार परिसरात पालिकेचे दुकान गाळे आहेत. पालिका प्रशासनाने संबंधित दुकानदारांना हे गाळे भाडेतत्वावर दिले आहेत. या दुकान गाळे भाड्यापोटी जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण १३ लाख ३२ हजार ४९१ रुपयाची मागणी होती. यापैकी पालिकेने आजापर्यंत ८ लाख १ हजार ५५९ रुपयांची वसुली केली आहे. या वसुलीची टक्केवारी ६०.१५ आहे. अद्यापही संबंधित दुकानदारांकडे ५ लाख ३० हजार ९३२ रुपयांचे भाडे कर शिल्लक आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या या भाडेकरू दुकानदारांकडे ४ लाख ९४ हजार ३६८ इतकी जुनी थकबाकी आहे.घर व दुकानाला ठोकले सील३१ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कराची १०० टक्के वसुली व्हावी, या दृष्टीकोणातून पालिकेच्या कर विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. कर वसुली वाढविण्यासाठी ८ मार्चपासून थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. पथकाने गोकुलनगरात ८ मार्च रोजी दोन घर व एका दुकानाला सील ठोकले. ९ मार्च रोजी विसापूर भागात दोन घराला सील ठोकून एक दुचाकी जप्त केली. सदर जप्ती कारवाईमुळे मालमत्ताधारकांचा थकीत कर भरण्याकडे कल वाढला आहे.थकीत मालमत्ता करधारकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा त्वरीत करून न.प. प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा मालमत्ता जप्ती कारवाईसोबतच संबंधित मालमत्ताधारकांचे नाव वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल. तसेच शहराच्या सार्वजनिक ठिकाणी थकबाकीदारांच्या नावाची यादी प्रसिध्द करण्यात येईल.- रवींद्र भंडारवार,कर विभाग प्रमुख, न.प. गडचिरोली

टॅग्स :Taxकर