शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

उन्हाळी धानावर किडीचे संकट

By admin | Updated: May 10, 2015 01:21 IST

देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे.

आरमोरी : देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक ऐन कापणीसाठी तयार होत असताना धानपिकावर कडाकडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह या धरणाचे पाणी आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा तालुक्याच्या काही गावांना पुरविले जाते. सदर धरण मोठे असल्याने खरीप हंगामासोबतच उन्हाळी धानपिकासाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये दरवर्षीच मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर अधिक धानाची लागवड करण्यात आली. दरवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाचा तडाखा कमी असल्याने धानपीक जोमात आले होते. त्यामुळे यावर्षी चांगले पीक येईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत होता. मात्र अचानक या धानपिकावर कडाकडपा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगाने आरमोरी तालुक्यातील शिवनी भागातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यात आले आहे. या रोगामुळे धानपीक करपल्यासारखे दिसून येत आहे. धानपीक करपल्याने त्याला लागलेले लोंबही भरत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे.रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली. मात्र रोग आटोक्यात न येता हळूहळू त्याचा विस्तार व प्रभाव वाढतच चालला आहे. कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च झाले आहेत. ऐन कापणीसाठी धान तयार होत असताना कडाकडपा रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले धानपीक करपतेवेळी शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यात केवळ या तिनच तालुक्यांमध्ये उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. हे धान विकून शेतकरी खरीप हंगामाच्या खर्चाची तजविज करतात. मात्र हजारो रूपये खर्च करूनही धानपीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)कृषी विभागाचे दुर्लक्षशेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषिसेवक नेमण्यात आले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊनही एकही कृषिसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कृषिकेंद्र मालकाला विचारून त्याच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत रोग आटोक्यात आला नाही. अशा संकटाच्या वेळी कृषिसेवक मार्गदर्शन करीत नसतील तर त्यांचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कृषिसेवकांना प्रत्यक्ष बांधावर पाठवून मार्गदर्शन करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.