अहेरी आगारातील अहेरी ते दामरंचा बससेवा काही वर्षांपूर्वी सुरळीतपणे सुरू होती. मात्र, रस्ता पूर्णपणे खराब असल्याच्या कारणाने बससेवा बंद करण्यात आली. सदर रस्ता सुरू करण्यासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याने संबंधित रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्णपणे झाले आहे. मात्र, आजच्या घडीला सदर रस्त्यांच्या डांबरीकरण करून पक्का रस्ता बनविण्यात आला असल्याने सदर रस्ता रहदारीस योग्य असल्याने परिवहन मंडळाकडून बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, सरपंच किरण कोडापे, प्रमोद कोडापे, सतीश चौधरी, कार्तिक तोगम आदी हजर हाेते. येत्या दहा-बारा दिवसांत बस सुरू करण्यात येईल, ग्वाही आगार व्यवस्थापक राठाेड यांनी दिली.