शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पोर्लाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवा

By admin | Updated: June 19, 2014 23:51 IST

पोर्ला आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तो सुरू करण्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार यांनी आशीष अण्णाजी झोडगे याला बोलाविले व सुरू असलेल्या वीज पुरवठ्यावर काम

मृतकाच्या भावाची मागणी : डॉक्टरच मृत्यूला जबाबदारगडचिरोली : पोर्ला आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तो सुरू करण्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार यांनी आशीष अण्णाजी झोडगे याला बोलाविले व सुरू असलेल्या वीज पुरवठ्यावर काम करण्यास सांगितले. त्यामुळे आशिषचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेला डॉ. करेवार जबाबदार आहेत, असा आरोप मृतकाचा भाऊ डंबाजी अण्णाजी झोडगे यांनी केला आहे. या संदर्भात खासदार अशोक नेते यांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २६ मे २०१४ ला सकाळी १० वाजता पोर्ला आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. करेवार यांनी आशिष झोडगे याला फोन करून बोलाविले व वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितले. त्यावेळी वीज प्रवाह सुरू होता. विजेचे काम करीत असताना शॉक लागल्याने आशिष खांबावरच लोंबकळत राहिला. त्याचे पूर्ण अंग भाजून गेले होते. त्याला उपचारासाठी गडचिरोली सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आशिषच्या या मृत्यूला पोर्ला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर गडचिरोली पोलिसांनी आशिषच्या मृत्यूला जबाबदार असल्यावरून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृतकाचा भाऊ डंबाजी अण्णाजी झोडगे यांनी केली आहे. गावात लाईनमन स्वत:चे काम करीत नाही. त्यामुळे गावातील अप्रशिक्षीत लोकांकडून विद्युत दुरूस्तीचे जोखमीचे काम करवून घेतले जातात. आरोग्य केंद्रासारख्या सरकारी संस्थेत लाईनमनला बोलावून दुरूस्तीचे काम व्हायला हवे. ही जबाबदारी डॉ. करेवार यांची होती. परंतु त्यांनी अप्रशिक्षीत व्यक्तीकडून काम करवून घेतल्याने ते या प्रकरणात दोषी आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.