जिमलगट्टा : जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या रेगुलवाही गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभे राहू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागते. ही परिस्थिती जिमलगट्टा व परिसरातील अनेक गावांची आहे. या परिसराला जंगलाने वेढलेले असून बाराही महिने नाल्यांना पाणी असते. गावात एकही तलाव नाही, अशी परिस्थिती रेगुलवाहीची होती. गेल्यावर्षी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गावाजवळ पाणी जमा झाले. आता या परिसरातील शेतकरी धानाचे दुबार पीक बंधाऱ्याच्या पाण्यामुळे घेऊ लागले आहे. यावर्षीसुध्दा हे पीक घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. (वार्ताहर)रेगुलवाहीला रस्त्याची प्रतीक्षाजिमलगट्टापासून रेगुलवाहीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहने जात नाही. दुचाकी वाहने किंवा पायदळ अथवा बैलबंडीने जावे लागते. या भागात विजेचा पुरवठा असला तरी वीज कधी येते व कधी जाते याचा नेम नाही. कधी कधी आठवडाभर विद्युत पुरवठा खंडीत राहतो, अशी परिस्थिती आहे. मात्र याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाले आहे.
रेगुलवाहीतील बंधाऱ्याने शेतकऱ्यांना दिला आधार
By admin | Updated: January 13, 2016 01:54 IST