शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सिरोंचातील जैवविविधता उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते.

ठळक मुद्देवनौषधींची झाडे झाली नामशेष : वनविभागाने झटकली देखभालीची जबाबदारी

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : वनविभागाच्या वतीने सिरोंचा शहरालगत निजामाबाद-जगदलपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या स्वरूपाचे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले. लाखो रुपयांच्या खर्चातून येथे विविध प्रकारची झाडे तसेच वनौषधींचे रोपटे लावण्यात आले. शिवाय नागरिक व बालकांसाठी विविध प्रकारची खेळणी व साहित्य बसविण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जैवविविधता उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे उद्यान आता शेवटच्या घटका मोजत आहेत.सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते. मात्र वनविभागाचे सदर वनोद्यानाच्या देखभालीकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे या वनोद्यानाच्या स्थितीवरून दिसून येते. नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या गवतांच्या कुटी जीर्ण अवस्थेत आहेत. बैलबंडीच्या पिरॅमिडला उधळी लागली असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथे अनेक झुले लावण्यात आले होते. मात्र या झुल्याचे केवळ स्टॅड उरले आहेत. मुख्य भाग व झुले गायब झाले आहेत. खेळणी फुटून खाली पडल्या आहेत. ट्रि होमची दुरस्था झाली असून सदर उद्यानातील हिरवेगार गवत आता दिसेनासे झाले आहे. हे गवत सुकून पडले असून केवळ पानांचा सडा दिसत आहे. सदर उद्यानातील वनौषधींची झाडेही नामशेष झाली असून झाडासमोर लावलेले फलक तेवढे शिल्लक आहेत.विकासाबाबत वनाधिकारी उदासीन?गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून सर्वाधिक जंगल अहेरी उपविभागात आहे. आलापल्ली व सिरोंचा या दोन विभागातील जंगलात मौल्यवान सागवान झाडे आहेत. जंगलावर विविध प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शासनासह वनाधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. मात्र सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक वन अधिकारी काही प्रमाणात उदासीन असल्याचे दिसून येतात. सिरोंचा वनविभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या जैवविविधता उद्यानाची देखभाल, संरक्षण करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर वनोद्यानाला आणखी विकसित करण्यासाठी आजपर्यंतच्या वनाधिकाºयांकडून कोणतेही ठोस नियोजन व प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग