शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्टÑीय स्तरावर लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:24 IST

राज्य घटनेने ओबीसींना दिलेल्या अधिकारांवर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देशेषराव येलेकर यांची माहिती : राष्टÑीय ओबीसी महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य घटनेने ओबीसींना दिलेल्या अधिकारांवर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात आहे. ओबीसींच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण राष्टÑीयस्तरावर लढा देऊ या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी यावर्षी दिल्ली येथे द्वितीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.ओबीसींच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी राष्टÑीय ओबीसी महासंघाची स्थापना करण्यात आली. या महासंघाचे पहिले अधिवेशन मागील वर्षी ७ आॅगस्ट रोजी नागपूर येथे संपन्न झाले. या महासंघाच्या वतीने दिलेल्या लढ्यामुळे फि शीपची मर्यादा वाढविली आहे. ओबीसीसाठी राज्य शासनाने स्वतंत्र मंत्रालय सुरू केले आहे. या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी इतर अनेक मागण्यांसाठी लढता द्यायचा आहे.ओबीसी समाजाची जनगणना घोषीत करून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, मंडल आयोग, नचिपन आयोग व स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, ओबीसी कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायलयापर्यंत सर्व न्यायीक स्तरांवर ओबीसींना आरक्षण लागू करावे, ओबीसी प्रवर्गाचा अ‍ॅक्ट्रोसिटी कायद्यामध्ये समावेश करावा, ओबीसी शेतकºयांवर वनहक्क क्षेत्रासाठी लागू केलेली तीन पिढ्यांची अट रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात तसेच परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक राज्य व जिल्हास्तरावर प्रशिक्षण संस्था सुरू करावी, राष्टÑीय व इतर मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा आदी मागण्यांसंदर्भात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रा. शेषराव येलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला दादाजी चापले, दादाजी चुधरी, पांडुरंग घोटेकर, एस. टी. विधाते, खुशाल वाघरे, अरूण मुनघाटे, कुणाल पडालवार, प्राचार्य डॉ. भुपेश चिकटे, गोविंदराव बानबले आदी उपस्थित होते.गडचिरोलीतून दिल्लीला २०० जण जाणारराष्टÑीय ओबीसी महासंघाचे दुसरे अधिवेशन दिल्ली येथे ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती तथा राष्टÑीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या यांच्या हस्ते केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय श्रम मंत्री बंडारू दत्तात्रेय, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री अशोक गलहोत, रेल्वे राज्यमंत्री राजेश गोहाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, पशु व दुग्ध मंत्री महादेव जानकर, खासदार हुकूमदेव यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला गडचिरोली येथून २०० नागरिक जाणार आहेत.