शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

२४२ ग्रामपंचायतीत टॉवरची संख्या वाढणार

By admin | Updated: October 27, 2016 01:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध; ब्राँडबँडचे जाळे पसरणारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे. डिसेंबर २०१६ अखेर जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायती ब्राँडबँड सेवेने जोडल्या जातील. जिल्हा प्रशासनाने चांगल्या नेटवर्कसाठी २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी दिली आहे. जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोेनवने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क बीएसएनएलचे आहे. काही कंपन्यांचे फोर-जी नेटवर्क उपलब्ध असताना बीएसएनएलचे कव्हरेज कमी आहे, अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात १० मोबाईल टॉवरची सेवा सुरू झाली आहे. याशिवाय ४० नव्या टॉवरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील २३ टॉवर उभारणीस जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित ठिकाणी येत्या आठ दिवसांत जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. केंद्र सरकारच्या नक्षलग्रस्त भागातील जिल्हे बळकट व सुरक्षित करण्याच्या योजनेत देखील मोबाईल नेटवर्क विस्ताराचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात हे प्रस्तावित ४० टॉवर असून याअंतर्गत एकूण १०० टॉवरचे काम होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)एटीएमची केंद्रांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सोय व्हावी व त्यांचा वेळ आणि त्रास कमी व्हावा, याकरिता एटीएम केंद्रांची संख्या वाढविण्यास बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिल्या. कुरखेडाच्या पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरावरील बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे बाबरे, तहसीलदार अजय चरडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये केवळ ६० एटीएम केंद्र आहेत. यातील बहुतेक केंद्र हे शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वारंवार शहरी भागात यावे लागते, यात वेळ व पैसा खर्च होतो. याची जाणीव बँकांनी ठेवण्याची गरज आहे. जिल्ह्यात किसान क्रेडीड कार्डधारक शेतकऱ्यांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. या सर्वांना ५० हजारांपर्यंत पतमर्यादा उपलब्ध आहे. मात्र एटीएम केंद्राअभावी त्यांना सवलत देणे अवघड झाले आहे. अगदी साध्या व्यवहारांसाठी शेतकऱ्यांना शहरी भागात तालुक्याच्या ठिकाणी येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.