शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

वाहनासह नऊ लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:04 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ सापळा रचून वाहनासह सुमारे ८ लाख ८० हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.

ठळक मुद्देएसडीपीओ पथकाची कारवाई : गोंदिया येथून आणली जात होती दारू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ सापळा रचून वाहनासह सुमारे ८ लाख ८० हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.एमएच ३६ एच १०९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने गोंदिया जिल्ह्यातून दारू आणली जात असल्याची गोपणीय माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने २९ एप्रिल रोजी आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांनी वाहनाला हात दाखविला मात्र वाहन थांबविले नाही. त्यामुळे सदर वाहनाचा पोलिसांनी खरपुंडी नाक्यापर्यंत पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता वाहनात १ लाख ८० हजार रूपये किमतीच्या दारूच्या बॉटलचे ३० बॉक्स आढळले. वाहन चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव अजय रामसेवक असाटी(४६) रा. गोंदिया असे सांगीतले. त्याच्या बाजुला बसलेल्या इसमाने शुभम अशोक कुर्वे(२४) असे सांगीतले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर ७ लाख रूपये किमतीचे चारचाकी वाहनसुद्धा जप्त केले. दोघांची चौकशी केली असता सदर दारू गोंदिया येथील सोनू पंजवानी याच्या मालकीची आहे. मार्ग दाखविण्यासाठी राकेश बलेचा हा सुद्धा गडचिरोलीत आला असल्याचे सांगीतले. राकेश बलेचा याला इंदिरा गांधी चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे. सोनू पंजवानी याच्या दारूविक्री संदर्भातील माहिती पोलीस घेत आहेत. या माहितीवरून पंजवानी याचे दारूचे साम्राज्य पोलिसांना माहिती पडणार आहे.चौघांच्याही विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एसडीपीओ पथकाचे एपीआय उद्धार, पोलीस हवालदार इरमलवार, नाईक पोलीस शिपाई गौरकार, सूरबसे, घोडाम यांनी केली.दारूविक्रेते हादरलेकुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिसांनी २८ एप्रिल रोजी कारवाई करीत पीकअप वाहन व सात लाख रूपये किमतीची दारू जप्त केली. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील दारूविक्रेते हादरले आहेत. लपवून ठेवलेल्या दारूचा आणखी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.