शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

आता गडचिरोलीतही ‘निसर्ग सफारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर्ग सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना वन औषधी उद्यान, वन्यजिवांसह विविध प्रजातींच्या वनस्पतींचे निरीक्षण करता येईल.

हरीश सिडामलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घनदाट जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यटकांच्या सेवेत वनविभागाने ‘निसर्ग सफारी’ उपलब्ध करून दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या धर्तीवरील ही सफारी गडचिरोलीपासून अवघ्या १२ किलोमीटर असलेल्या गुरवळाजवळील जंगलात राहणार आहे. त्यामुळे हे नवीन वनपर्यटनस्थळ गडचिरोली जिल्ह्यासह इतर भागांतील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या पर्यटन केंद्राचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर्ग सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना वन औषधी उद्यान, वन्यजिवांसह विविध प्रजातींच्या वनस्पतींचे निरीक्षण करता येईल. निसर्गाचे विलक्षण नजारेही येथे पाहायला मिळतील. त्यामुळे ही निसर्ग सफारी पर्यटकांना नक्कीच भुरळ पाडणार आहे.या लोकार्पणप्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. एस. आर. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबोळे, शिरपूरचे सरपंच दिवाकर निसार यांच्यासह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नऊ तरुण मार्गदर्शकाच्या भूमिकेत गुरवाळा नेचर सफारीला येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निसर्ग सफारीची सविस्तर माहिती देण्यासाठी गुरवळा, मारकबोडी, हिरापूर, येवली, मारोडा आदी गावांतील नऊ तरुणांना येथे मार्गदर्शक म्हणून ठेवण्यात आले आहे. हे गाइड पर्यटकांना सोबत घेऊन जंगलात सफारी करणार आहेत.

१७ प्रकारच्या वन्यजिवांचे होणार दर्शन

‘गुरावळा नेचर सफारी’दरम्यान १७ प्रकारचे विविध वन्यजीव पाहता येणार आहेत. यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रा, कोल्हा, हायना, रानडुक्कर, तडस, चितळ, चौसिंगा, भेकड, सायल, माकड, नीलगाय, मोर, रानकोंबडी यासह इतर वन्यप्राण्यांच्या दर्शनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. याशिवाय ४० विविध प्रकारच्या झाडांच्या प्रजातींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच १४ विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहितीही उपलब्ध होणार आहे. त्यात प्रामुख्याने रिठा, गुडवेल, बेल, गुंज, कडुनिंब, सर्पगंधा, कणेर, निरगुडी, खंडू चक्का, पानफुटी, तुळशी, शतावरी, लेंडी पिपरी, हाडांची जोड इत्यादीचा समावेश आहे.

सफारीत ५२ किलोमीटरचा फेरफटकागुरवळा नेचर सफारी घनदाट जंगल परिसरात असेल. या सफारीचे एकूण क्षेत्रफळ ३७३२ हेक्टर आहे, म्हणजे सुमारे ५२ किमी अंतर या सफारीत कापता येईल. संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा तास लागतील. या ठिकाणी आठ खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :tourismपर्यटनforest departmentवनविभाग