शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बालकांना मोबाईलचे वेड; पारंपरिक खेळ कालबाह्य

By admin | Updated: November 14, 2015 01:34 IST

१० ते १५ वर्षांच्या पूर्वीचा विचार केल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने ...

बालक दिन विशेष : आधुनिकतेच्या नावावर हरवत चालले बालपण; खेड्यातूनही लुप्त होत आहेत खेळणीगडचिरोली : १० ते १५ वर्षांच्या पूर्वीचा विचार केल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टिना, ५-१०-२५ पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व खेळ व वस्तू लुप्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली बालकांचे बालपण हरवत चालले आहे. पारंपरिक खेळांतील वस्तूंच्या आठवणी ताज्या करण्याकरिता सध्या केवळ चित्र आणि फोटोच उरले आहेत. सध्या व्हॉट्सअ‍ॅप या अप्लिकेशनच्या माध्यमातून हे जुने फोटो एकमेकांना पाठवून तो काळ पाहिलेले युवक व वृद्ध जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचेच दिसून येत आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मैदानातील खेळांना अनन्यसाधारण महत्त्व होते. यात सर्वच खेळांचा समावेश होत असला तरी सध्या केवळ क्रि केट हाच खेळ चिमुकले खेळताना दिसतात. पूर्वी गिल्ली-दांडू हा खेळ मुलांमध्ये प्रसिद्ध होता. हल्ली हा खेळ कुठेही खेळला जात नसून त्यासाठी मैदानेही नाही, अपवादात्मक खेड्यांमध्ये दिसून येईल. हे वास्तव आहे. लगोरी, लंगडी या खेळांचा प्रकार असलेला सातघर हे खेळ मुलींमध्ये त्या काळी प्रसिद्ध होते. सध्या मुलं-मुली प्रगत झाल्यागत वागत असल्याने हे जुनाट खेळ खेळले जात नाही. पूर्वी गल्ली-बोळात खेळले जाणारी लगोरी, लंगडी हे खेळ आता दिसेनासे झाले आहेत. आता मुला-मुलींमध्ये संगणक, मोबाईलवरील खेळांसह टीव्हीवरील व्हिडीओ गेम अधिक प्रसिद्ध झाले आहेत. बसल्या जागेवर खेळले जाणारे हे खेळ मुले खेळतात. यात शरिराला कुठलाही व्यायाम होत नाही. उलट विकार वाढण्यास आणि शारीरिक विकास खुंटण्यास हे खेळ कारणीभूत ठरत आहेत. मानसिकरित्या नवीन पिढी प्रगत घडत असली तरी दिवसेंदिवस शारीरिकदृष्ट्या दोष असलेली मुले-मुली अधिक आढळून येत आहेत. मुलांमध्ये गिल्ली-दंड्यासह भोवरा हा खेळही मोठाच प्रसिद्ध होता. एकट्यानेही तो खेळता येत होता आणि चार-चौघे जमले तर त्यात धम्माल असायची. पण सध्या प्लास्टिकचे भोवरे बाजारात मिळतात. या भोवऱ्यांना दोराने फिरवावेही लागत नाही. त्यासाठी तत्सम यंत्रही मिळते. यातही शरिराला व्यायामासाठी कुठेच वाव नाही. शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, फुटबॉल यासह अन्य खेळ खेळविले जात असून स्पर्धाही घेतल्या जातात. तेवढाच विद्यार्थ्यांना व्यायाम होतो; पण या मातीतील खेळातून होणारी कसरत बंद झाल्याचे चित्र आहे. हल्ली मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवरच मुला-मुलींच्या विविध खेळांतील गमती-जमती होत असल्याने बालकांना पूर्वीसारखे पारंपरिक खेळ खेळण्यास मिळत नाही. त्यामुळे बालपण हरवत आहे. (शहर प्रतिनिधी)