अहेरी : महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सिरोंचा येथे सुरू आहे. या पुलाला दिवंगत आर. आर. पाटील यांचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी राकाँचे प्रदेश सचिव इरफान खान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.आर. आर. पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारून दूरदृष्टिकोनातून या जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. तीन राज्यांना जोडणाऱ्या ६०० कोटी रूपयांच्या तीन पुलाचे काम त्यांनी मंजूर करून आणले व ३०० कोटी रूपयांच्या आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या पुलाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी इरफान खान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून राज्य सरकारकडे याबाबत पक्षाच्या स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
आंतरराज्यीय पुलास आर. आर. पाटील यांचे नाव द्या
By admin | Updated: February 19, 2015 01:35 IST