शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

सापळे पीक पद्धतीतून केली जातेय कारल्यांची नाविन्यपूर्ण शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातल्या पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. विसोऱ्यापासून दक्षिणेस १० किमीवरच्या किन्हाळा येथील पुरुषोत्तम ठाकरे या शेतकऱ्याने कारली पिकासोबत सापळे पीक पद्धतीचा वापर केला. त्यात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड केली. एकाच खर्चात दोन उत्पन्नाचे स्रोत या शेतकऱ्याने निर्माण केले.

ठळक मुद्देआंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड, कृषी विभागाच्या पुढाकाराने किन्हाळा येथील शेतकऱ्याचा पुढाकार

अतुल बुराडेलाेकमत न्यूज नेटवेर्कविसोरा : धानपट्ट्यातील शेतकरीही आता आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करायला लागले आहेत. किन्हाळा या गावातील एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत सापळे पद्धतीतून कारल्यांची लागवड केली. त्यात आंतरपीक म्हणून झेंडूच्या फुलांचे लागवड केली. त्यामुळे या शेतकऱ्यांला दुहेरी उत्पन्न मिळणार आहे. बेभरवशाची शेती म्हणून नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या या व्यवसायातून तांत्रिक मार्गदर्शन आणि मेहनतीतून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते, हेच यातून दिसून येते.  आता वर्षभरात कधीही पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा शेतातील अंदाज चुकतात. त्यात धान पट्ट्यातील शेतकरी धान पिकालाच अधिक प्राधान्य देतात. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातल्या पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. विसोऱ्यापासून दक्षिणेस १० किमीवरच्या किन्हाळा येथील पुरुषोत्तम ठाकरे या शेतकऱ्याने कारली पिकासोबत सापळे पीक पद्धतीचा वापर केला. त्यात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड केली. एकाच खर्चात दोन उत्पन्नाचे स्रोत या शेतकऱ्याने निर्माण केले. विशेष म्हणजे, झेंडू लागवडीतून जमिनीसोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे कामही होत असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. सध्या कारली आणि झेंडू फुलांची रोजच तोडणी केली जात आहे. एकूणच या शेतकऱ्याने आर्थिक लाभ आणि जमिनीसोबत पर्यावरणीय संतुलन राखले आहे. हा शेती प्रयोग इतर अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम आणि एस.जी.रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. शेती नफ्याची राहिलेली नाही अशी ओरड हाेत असताना काही शेतकरी हे खाेटे ठरवत आहेत.

झेंडूमुळे तिहेरी लाभकृषी विभागाच्या मार्गदर्शनातून किन्हाळाच्या पुरुषोत्तम ठाकरे यांना कारलीच्या शेतामध्ये सापळे पीक पद्धतीचा वापर करण्याचे सुचले. कारली पिकाची लागवड केल्यावर जी जागा उरते त्या मोकळ्या जागेमध्ये ठाकरे यांनी झेंडू फुलांची लागवड केली. झेंडूची फुले मधमाशांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. त्यामुळे फुलांवरील परागीकरण चांगल्या प्रकारे होते. दुसरे झेंडूच्या मुळांमुळे जमिनीतील सूत्रकृमींचे नियंत्रण होते. सूत्रकृमी कोणत्याही पिकांच्या मुळांना नष्ट करू शकतात. आणि तिसरे झेंडू विक्रीतून उत्पन्नात भर, असा तिहेरी फायदा झेंडूच्या शेतीतून होतो.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी