शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

महिलांची घोडदौड सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:35 IST

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन सुरू आहे. शिवाय जिल्ह्यात महिलांच्या विविध संघटना असल्यामुळे महिला शक्ती एकवटली आहे.

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : कर्तबगार सखींचा दिमाखदार सन्मान सोहळा रंगला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन सुरू आहे. शिवाय जिल्ह्यात महिलांच्या विविध संघटना असल्यामुळे महिला शक्ती एकवटली आहे. त्यात लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिलांची मोठी चळवळ उभी राहत असल्याने आपल्या कर्तृत्वावर यशाचे शिखर गाठणाºया महिलांची घोडदौड आता कोणीही रोखू शकणार नाही. ती आणखी गतीने सुरूच राहिल, असे ठाम प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºया महिलांना लोकमत सखी मंचच्या वतीने सखी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सखी सन्मान पुरस्काराचा हा दिमाखदार सोहळा दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल येथे सोमवारी रंगला.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, नगरसेवक प्रमोद पिपरे, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत समाचारचे सुनील चौरसिया आदी मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व नगराध्यक्ष योगीता पिपरे, शैक्षणिक क्षेत्रातून वंदना मुनघाटे, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातून डॉ. माधुरी किलनाके, उद्योग व व्यवसाय क्षेत्रातून मिना आभारे, शौर्य क्षेत्रातून पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, क्रीडा क्षेत्रातून सरीता निजाम (मस्के) तसेच साहित्य व कला क्षेत्रातून अश्विनी रेवतकर यांना सखी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर भैरवी नरेंद्र भरडकर आणि श्रेष्ठी मुलकलवार यांना बालवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पुढे बोलताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, सत्कार हा कोणत्याही व्यक्तीचा नसून तो कार्याचा होत असतो. आता समाजकारणातील राम होण्याची गरज आहे. महिलांच्या बाबतीत पुरूषानेही संवेदनशीलता ठेवण्याची आवश्यकता आहे. महिलांना अशा पुरस्कार सोहळ्यातून मोठे प्रोत्साहन मिळत असून त्यांच्या कार्यालाही उभारी मिळत असते, असे पोरेड्डीवार म्हणाले.डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, सखी हा व्याख्यानाजोगा व निस्सीम प्रेमाचा प्रतीक असलेला शब्द आहे. लोकमत समुहाने महिलांचे काम त्यांची कला व त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचे सातत्याने काम केले आहे. सामाजिक दृष्टीकोण लोकमत समुहाने कायम जपला आहे, असे ते म्हणाले.प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले, लोकमतने महाराष्टÑासह आता गोवा राज्यही व्यापला आहे. लोकमत वाचल्याशिवाय दिवसाची चांगली सुरूवात होत नाही. लोकमत वृत्तपत्र नसून ती सवय आहे. अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोकमतकडून सातत्याने सुरू आहे. मराठी वृत्तपत्रात लोकमत हे सरस वृत्तपत्र ठरले आहे. सखी मंच, बाल मंच व युवा मंचच्या माध्यमातून लोकमत समुहाने मोठी चळवळ उभी केली असून त्यांना लोकोपयोगी काम करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन केले जात आहे, असे प्राचार्य मुनघाटे यांनी सांगितले.याप्रसंगी मनोहर हेपट, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही मार्गदर्शन केले व लोकमत समुहाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, संचालन प्रिया आखाडे यांनी केले तर आभार लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांनी मानले. कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, बाल मंचच्या संयोजिका किरण पवार, युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, सखी मंच सदस्य प्रिती मेश्राम, सोनिया बैस, दिलीप दहेलकर, अमोल श्रीकोंडावार व जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राचार्य सागर म्हशाखेत्री, स्मिता लडके, नरेंद्र भरडकर, अमिता मडावी, प्रभाकर वासेकर, शंकर सालोटकर, डॉ. प्रविण किलनाके तसेच शिक्षक, विद्यार्थी व सखी सदस्य हजर होत्या.जर्मन युवक-युवतींची हजेरीइंडो-जर्मन फे्रन्डशिप सोसायटीअंतर्गत जर्मनीतून गडचिरोली जिल्ह्यात अभ्यास दौºयासाठी आलेले आयके व लिओनी या युवक-युवतींनी सोमवारी लोकमत सखी मंचच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी लिओनी हिने मला या ठिकाणी जो सन्मान मिळाला त्यामुळे मी भारावून गेल्याचे सांगितले. तर आयके याने येथील लोक खूप चांगले असून अशा उपक्रमातून महिलांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली.