शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जंगलात मिळालेल्या प्राचीन नाण्यांचा केला संग्रह

By admin | Updated: November 17, 2014 22:53 IST

जंगलातून प्राप्त झालेल्या वस्तूंचा संग्रह करण्याची वृत्ती एखाद्या व्यक्तीत बळावेल, हे क्वचितच पाहावयास मिळते. परंतु नकळत प्राप्त झालेल्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद देलोडा (बु.) येथील

गोपाल लाजुरकर - गडचिरोलीजंगलातून प्राप्त झालेल्या वस्तूंचा संग्रह करण्याची वृत्ती एखाद्या व्यक्तीत बळावेल, हे क्वचितच पाहावयास मिळते. परंतु नकळत प्राप्त झालेल्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद देलोडा (बु.) येथील एका विद्यार्थ्यास जडलेला आहे, असे त्याने केलेल्या नाणींच्या संग्रहावरून दिसून आले आहे.देलोडा (बु.) येथील रितिक संजय गावडे हा विद्यार्थी दोन महिन्यापूर्वी लग्नमंडपाकरिता जंगलात डेर व फाटे आणण्याकरिता नागरिकांसह गेला असता, त्याला जंगलात एक वस्तू चमकतांना आढळून आली. जंगलात अशी कोणती वस्तू आहे, की जी चमकत आहे, याचे रितिकला नवल वाटले. तो लगेच त्या वस्तूच्या जवळ पोहोचला, बघतो तर काय, वरती एक नाणे त्याला दिसून आले. त्यानंतर रितिकने एक फुट खड्डा खणून बघितले तर त्याला १५ ते १६ नाणी आढळून आल्या. रितिकने रितिकने सदर नाणींचा संग्रह करून पुन्हा त्यात ८ ते १० पुरातनकालीन नाणींची भर घातली. सध्य:स्थितीत रितिकने २१ प्राचीन व इंग्रजकालीन नाणींचा संग्रह केला आहे. रितिक गावडे सध्या शहरातील जि. प. हायस्कूलमध्ये इयत्ता ९ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. मात्र त्याला लागलेला नाणी संग्रहाचा छंद अवर्णनीय आहे. संग्रहीत केलेल्या नाण्यांमध्ये प्राचीन नाण्यांसह इंग्रजकालीन नाण्यांचा समावेश आहे. यात १९०४ मधील एडवर्ड सातवा याच्या नाव व प्रतिमेसह ‘वन क्वॉर्टर आनाज इंडिया’ असे नमूद आहे. त्याबरोबरच ‘जॉर्ज फाईव्ह किंग एम्परर वन क्वार्टर’ यांच्या प्रतिमेसह १९१२, १९३५ या काळातील नाणी आहेत. तसेच ‘जॉर्ज सिक्स्थ किंग एम्परर टू आनाज १९४३’ आदी चार ते पाच इंग्रजकालीन नाणींचा संग्रह रितिकने केला आहे. शिवाय भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या अनेक नाणी त्याने बाळगल्या आहेत. यामध्ये १९५७ मधील ‘रूपयें का २० वा भाग पाँच पैसे’ यासह इतर नाणी बाळगली आहेत. १९०४, १९१२, १९१७, १९३४, १९३५, १९३९, १९४३ आदी नाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. तर १९५७, १९७६ या काळातीलही नाणी त्याने शालेय जीवनापासूनच बाळगायला सुरूवात केली आहे.प्राचीनकालीन नाण्यांची जोपासना केली. मात्र या सहा नाण्यांवरील मुद्रीत झालेली भाषा कोणती, याबाबत रितिकही अनभिज्ञ आहे. नाण्यांवरील भाषा जाणून घेण्याचा त्याने अनेक मार्गदर्शकांकडून प्रयत्न केला. मात्र त्याला सदर नाण्यांवरील भाषा कळू शकली नाही. सर्वसाधारणपणे सामान्यांसाठी प्राचीनकालीन नाण्यांवरील भाषा अनभिज्ञच आहे. नाणीसंग्रह करण्याचा आपला छंद अधिक दृढ करू, असा आत्मविश्वास त्याने बाळगला आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच ऐतिहासिक, प्राचीनकालीन वस्तूंच्या संग्रहाचा छंद त्याला नकळतपणे जडला आहे.