आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने ज्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले त्यांना बोनस दिला नाही. गेल्या वर्षीचे सेवा सहकारी संस्थांचे धान खरेदीचे कमिशन अजूनपर्यंत दिले नाही. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उघड्यावरील धान्य खराब होते. अजूनही रब्बी हंगामातील धान व मका खरेदी करण्यात आलेला नाही. उन्हाळी धान पिकवणारे शेतकरी अजूनही आपला धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. पीडित शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची सुरुवात चामोर्शी येथून करण्यात आली. त्यानंतर दि. २६ मेपासून ज्या-ज्या गावातील शेतकऱ्यांचे पैसे व बोनस शासनाने दिले नाही, गावातील शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाईन करण्यात आलेले नाही, ज्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आले; परंतु त्यांचा परतावा अजूनपर्यंत दिलेला नाही अशा पीडित शेतकऱ्यांच्या गावी त्यांच्या घरी कोरोना नियमांचे पालन करीत आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.
चामोर्शी येथे मुख्य चौकात आयोजित आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, प्रतीक राठी तालुकाध्यक्ष भाजयुमो, जिल्हा महामंत्री ओबीसी आघाडी आशिष पिपरे, तालुका उपाध्यक्ष भाजपा जयराम चलाख आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
===Photopath===
250521\1439img-20210525-wa0064.jpg
===Caption===
चामोर्शीत महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे आंदोलन