शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

बायोमेट्रिक प्रणालीसाठी ४३ कॉलेजचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:03 IST

शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देताच संस्थाचालकांनी लगबगीने कार्यवाही करून आपल्या विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली.

ठळक मुद्देदोन महाविद्यालयाची पाठ : संस्थाचालकांकडून चांगला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देताच संस्थाचालकांनी लगबगीने कार्यवाही करून आपल्या विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या विज्ञान शाखेच्या एकूण ४५ पैकी ४३ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली आहे. केवळ दोन विनाअनुदानित महाविद्यालयांनी या प्रणालीकडे पाठ फिरविली आहे.कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेला नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि केवळ कोचिंग क्लासेसला जायचे, असे करणाºया विद्यार्थ्यांना चाप बसावा, यासाठी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचा महत्त्वपूणे निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला असला तरी जिल्ह्यातील बºयाच महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान शाखेचे सर्व व्यवस्थापनाचे मिळून एकूण ४५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. विज्ञान शाखेचे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर नियमित वर्गांमध्ये उपस्थित न राहता, कोचिंग क्लासमध्ये जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याला प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचा निर्णय १५ जून २०१८ रोजी घेण्यात आला.बायोमेट्रिक पध्दती तपासणीचे अधिकार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक यांना देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत याबाबतचा अहवाल गट शिक्षणाधिकाºयांमार्फत मागविण्यात आला आहे. ज्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक पध्दती कार्यान्वित केली आहे, अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी वाढली असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत याबाबत कठोर पावले उचलली तर सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.संचमान्यतेसाठीच्या प्रपत्रात उल्लेखजिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आॅक्टोबर महिन्यात संचमान्यता शिबिर गडचिरोलीत आयोजित करण्यात आले. या शिबिरापूर्वी शिक्षण विभागाने विज्ञान शाखेच्या सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून संचमान्यतेसाठी बायोमेट्रिक प्रणाली महाविद्यालयात कार्यान्वित केल्याबाबतचे प्रपत्र भरून देणे अनिवार्य असल्याचे महाविद्यालयांना कळविले. तसेच ज्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविली जाणार नाही, अशा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन थांबविण्याचाही इशारा शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांनी याबाबतची गांभिर्याने दखल घेऊन आपल्या महाविद्यालयात लगबगीने बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. संचमान्यतेदरम्यान बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केल्याबाबतचे प्रपत्रही संबंधित महाविद्यालयाने भरून दिले आहे. बायोमेट्रिक प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली. त्यामुळे आता जिल्ह्यात ९५ टक्के महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.शासन निर्णयानुसार विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांना तसे निर्देश देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४३ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून या पध्दतीने विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविली जात आहे. या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. आकस्मिक भेटी देऊन महाविद्यालयाची तपासणी सुध्दा या संदर्भात केली जाणार आहे.- रमेश उचे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. गडचिरोली

टॅग्स :collegeमहाविद्यालय