शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

‘ मोमोज’ सेहत के लिए तू तो हानिकारक है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:35 IST

वाफळते,उकडलेले, मऊ मऊ असणारे, आतमध्ये रसरशीत सारण भरलेले मोमोज नुसते पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. पण मोमोजचं आकर्षण हे एवढ्यापुरतीच ठीक आहे. कारण मोमोज जीभेला जेवढी भुरळ घालतात तितकेच आजारही पाठीमागे लावू शकतात. याबाबतीत झालेले अनेक अभ्यास मोमोजपासून जरा जपून हाच संदेश देत आहेत.

ठळक मुद्दे* मोमोज तयार करताना वापरल्या जाणार्या घटकांमुळे मोमोज आरोग्याच्यादृष्टीनं हानिकारक ठरत आहे.* मोमोजमध्ये आरोग्यास घातक असे मैदा, अ‍ॅझोडिकार्बोनामाइड, क्लोरोनिगॅस, बेन्झॉयल पेरॉक्साइडस आणि हानिकारक पूडींचा वापर केला जातो.* टेपवॉर्मसारखे अतिशय घातक जंतू मोमोजमुळे शरीरात प्रवेश करतात.

- माधुरी पेठकरहल्ली स्ट्रीट फूडमध्ये एक चटकदार आयटम अ‍ॅड झाला आहे. तो म्हणजे मोमोज. बाहेर पडल्यावर जेवढ्या असोशीनं पाणीपुरी, भेळपुरी खावीशी वाटते तितक्याच तीवतेनं मोमोजही खाण्याची इच्छा होते. मोठमोठ्या मॉलच्या समोर मोमोज विकणार्या छोट्या छोट्या गाड्या उभ्या असतात. पण त्याच्यासमोरची गर्दी मात्र मोठी असते. खास मॉलसमोरचे मोमोज खायचे म्हणून मॉलमध्ये चक्कर टाकून येणारेही खूपजण असतात. वाफळते,उकडलेले, मऊ मऊ असणारे, आतमध्ये रसरशीत सारण भरलेले मोमोज नुसते पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. पण मोमोजचं आकर्षण हे एवढ्यापुरतीच ठीक आहे. कारण मोमोज जीभेला जेवढी भुरळ घालतात तितकेच आजारही पाठीमागे लावू शकतात. याबाबतीत झालेले अनेक अभ्यास मोमोजपासून जरा जपून हाच संदेश देत आहेत.मोमोज तयार करताना वापरल्या जाणार्या घटकांमुळे मोमोज आरोग्याच्यादृष्टीनं हानिकारक ठरत आहे. त्यामुळे रोज उठून मोमोज खायला न जाणं हेच उत्तम! 

मोमोजचे दुर्गुण

1) मोमोज करताना मैदा वापरला जातो. मैद्याचं सेवन शरीरास हानिकारक असतं. शिवाय मोमोजमध्ये अ‍ॅझोडिकार्बोनामाइड, क्लोरोनिगॅस, बेन्झॉयल पेरॉक्साइडस आणि हानिकारक पूडींचा वापर केला जातो. या घटकांमुळे मोमोज चवीला चटकदार होतात पण आरोग्याचा विचार करता त्यांची गुणवत्ता एकदमच घसरते.

2) मोमोज हे नॉनव्हेजमध्येही उपलब्ध असतात. किंबहुना नॉनव्हेज मोमोज खाणारेही खूप आहेत. पण संशोधकांच्या अभ्यासानुसार नॉनव्हेजमध्ये वापरलं जाणारं चिकन हे नित्कृष्ट प्रतीचं आणि बर्याचदा उतरलेलं असतं. जे पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूपच घातक असतं.

3) व्हेज मोमोजचीही तर्हा  तशीच. व्हेज मोमोजमध्ये वापरल्या जाणार्या भाज्या व्यवस्थित धुतलेल्या आणि शिजवलेल्या नसतात. यामुळे इकॉइल सारखे घातक जंतू पोटात जातात. आणि पोटाच्या संसर्गाला कारणीभूत ठरतात.

4) मोमोजबरोबर देण्यात येणारी चटणी एकदम झणझणीत असते. यासाठी वापरल्या जाणार्या मिरची पूडमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. आणि एवढी झणझणीत चटणी खाण्यात आल्यानं रक्तस्त्राव किंवा मूळव्याध सारखे आजार मूळ धरतात आणि नंतर बळावतातही.

5) मोमोजमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेटचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे अतिलठ्ठपणा सोबतच, उदासिनता, अति घाम येणं, मळमळ, छातीत धडधडणं असे आजारही होवू शकतात.

6) टेपवॉर्मसारखे अतिशय घातक जंतू मोमोजमुळे शरीरात प्रवेश करतात. हे जंतू मेंदूत घर करतात आणि पुढे वाढत राहतात. जीवघेणे आजार यातून उदभवू शकतात.