शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील!

By admin | Updated: June 6, 2017 18:04 IST

बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही.

-सारिका पूरकर-गुजराथीहॉटेलिंग आता अंगवळणी पडलंय साऱ्यांच्याच. पण तरीही घरच्या चवीला आणि पदार्थांना पर्याय नाही हेच खरं. आज भूक लागली तर बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही. आज अनेक घरात हे पदार्थ केले जात नाहीत पण त्याच्या चवी आजही जीभेवर आहेत. मुलांनी खाऊ मागितला की दुकानातलाच खाऊ का आठवतो? आपल्या लहानपणी आपल्याला आई आजी जो खाऊ द्यायची तो आपल्या मुलांसाठीही करून बघा की. मुलांच्या भुकेचा प्रश्न सुटेल आणि महत्त्वाचं म्हणज घरी बनणारा हा पौष्टिक खाऊ मुलांचाही फेव्हरिट होइल. असं म्हणतात मुलांना सर्व प्रकारच्या चवींची ओळख करून द्यावी त्यातूनच मुलांची टेस्ट तयार होते. ‘आमच्या मुलांना काय बाहेरचंच आवडतं’असं त्यांच्या आवडीविषयी सांगण्याआधी आपण मुलांना घरचा खाऊ आवडीनं खाऊ घातलाय का? याचा विचार आधी करा. आणि नाही असं उत्तर आलं तर हा घरचा खाऊ नक्की करून बघा. तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलांचाही तो आॅलटाइम फेव्हरिट होईल हे नक्की!१) गुळपापडीगुळपापडी आठवते आणि आवडतेही पण खाऊन किती दिवस झाले ते कोणी सांगेल का? महिने की वर्ष? असो. गव्हाची कणिक, साजूक तूप आणि गुळ या अवघ्या तीन घटकांची ही करामत आहे. कोरडी गुळपापडीही असते. कणिक तूपावर भाजून त्याला गुळ चोळून ठेवायचा आंओ गार झाले की हपके मारायचे तोंडात. गुळाऐवजी साखरही घातली तरी चालते. गुळ आणि कणिक पौष्टिक असतातच. त्यापासून बनलेली गुळपापडी ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविष्टही असते.

               

२) तुक्कडखीरतुम्हाला वाटले असेल की आता हा कोणता खिरीचा नवीन प्रकार? पण हा प्रकार गोड नाही तर तिखट खिरीचा आहे. पूर्वी काटकसरीचा संस्कार सगळ्यांवर असायचा. अन्नाची नासाडी तर खपवूनच घेतली जात नसत. त्यातूनच हा पदार्थ जन्मला असावा असं वाटतं. कारण हा पदार्थ शिळ्या पोळ्यांपासून बनतो. शिळ्या पोळ्या चाळणीत पसरवून हवेशीर ठेवल्या तर त्या कडक होतात. नंतर लसूण, कढीपत्ता, जिरे-मोहरी,हळद आणि हिंगाची खमंग फोडणी पाण्याला द्यायची. पाण्याला उकळी फुटली की त्यात कडक पोळीचे मोठे तुकडे घालायचे. गॅस बंद करुन मीठ, कोथिंबीर टाकली की झाली तुक्कडखीर तय्यार. या खिरीला पुन्हा उकळी आणायची नसते. नाहीतर पोळी मऊ होऊन लगदा होतो. पोळीचे तुकडे थोडे कडक राहायला हवे. पोळ्यांऐवजी शिळ्या पण थोड्या कडक झालेल्या पुऱ्याही चालतात. चव अगदी भन्नाट. हा देखील पोटभरीचाच पदार्थ बरं का !

 

             ३) उबजे पूर्वी अनेकांकडे गणेशोत्सवात हा पदार्थ हमखास व्हायच. तांदळाच्या कण्या, हरभरा डाळ, आवडत असल्यास थोडी मूगडाळ, शेंगदाणे भिजत घालून ते उपसून घ्यायचं. नंतर खमंग फोडणीवर सर्व परतून वाफेवर कण्या शिजवायच्या. . कणी मोकळी राहायला हवी. त्याचा भात होता कामा नये या बेतानं ती शिजवायची. वरतून ओलं खोबरं, कोथिंबीर पेरुन अन लिंबू पिळून खायचं. हा पदार्थ एकदा खाल्ला की समाधान होत नाही. परत परत हवासा वाटतो.४) गोड शेंगदाणे शरीरात जेव्हा रक्ताची कमतरता निर्माण होते म्हणजेच जेव्हा अ‍ॅनिमिया होतो तेव्हा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुळ-शेंगदाण्याचा लाडू खायला सांगितलं जातं. याला गोड शेंगदाणे हाही चांगला पर्याय आहे. गुळाच्या किंवा साखरेच्या पाकातील हे शेंगदाणे खूप मस्त लागतात.

 

  ५) रस-शेवयायासाठी बारीक शेवया घ्यायच्या. त्या उकळलेल्या पाण्यात घालून लगेचच चाळणीत निथळत ठेवायच्या. शेवया पूर्ण निथळल्या की या उकडलेल्या शेवया डिशमध्ये घालायच्या आणि त्यावर आंब्याचा घट्ट रस आणिन साजूक तूपाची धार धरायची. ६) आंबा पोळी आंब्याचा रस एका ताटात पसरवून ते ताट कडक उन्हात ठेवायचं. ते वाळलं की आंबा पोळी तयार.