हंसल मेहतांच्या 'स्कॅम ३'मध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता झळकणार, सुब्रतो रॉय यांची भूमिका साकारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:11 IST2026-05-14T10:11:34+5:302026-05-14T10:11:50+5:30

हंसल मेहतांच्या 'स्कॅम ३' चा हिरो ठरला 'हा' लोकप्रिय मराठी अभिनेता

Siddharth Bodke To Play subrata Roy Lead Role In Hansal Mehtas Upcoming Scam 3 Web Series | हंसल मेहतांच्या 'स्कॅम ३'मध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता झळकणार, सुब्रतो रॉय यांची भूमिका साकारणार!

हंसल मेहतांच्या 'स्कॅम ३'मध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता झळकणार, सुब्रतो रॉय यांची भूमिका साकारणार!

 Scam 3 Web Series : सध्या ओटीटीवर सत्य घटनांवर आधारित काही वेबसीरिज येत असून प्रेक्षकांनाही त्या आवडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात हंसल मेहता यांच्या 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी' या सीरिजचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. १९९२ सालातील शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित या सीरिजनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित 'स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी'लाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. 'स्कैम १९९२' आणि 'स्कॅम २००३' या दोन सीरिजनंतर 'स्कॅम' फ्रँचायझीचा तिसरा भाग, 'स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्याची वर्णी लागल्याची चर्चा आहे.

तर तो अभिनेता आहे सिद्धार्थ बोडके. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सिद्धार्थ बोडके  'स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा'मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे. सिद्धार्थने आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. नाशिकच्या रंगभूमीपासून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थने खलनायक असो वा नायक प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केले आहे.


'स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा' ही सीरिज सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. सुब्रतो रॉय यांचे यश, वैभव, त्यांच्याभोवती असलेले वादाचे वलय आणि त्यानंतर झालेलं पतन, हा सर्व थरार या सीरिजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Web Title : 'स्कैम २०१०' वेब सीरीज में सुब्रत रॉय बनेंगे सिद्धार्थ बोडके!

Web Summary : खबर है कि अभिनेता सिद्धार्थ बोडके 'स्कैम 2010: द सुब्रत रॉय सागा' में सुब्रत रॉय की भूमिका निभाएंगे। यह सीरीज रॉय के जीवन, सफलता, विवादों और पतन को दर्शाएगी, जो पिछली 'स्कैम' सीरीज की सफलता के बाद आ रही है।

Web Title : Siddharth Bodke to play Subrata Roy in 'Scam 2010' web series.

Web Summary : Actor Siddharth Bodke is rumored to star in 'Scam 2010: The Subrata Roy Saga,' portraying Subrata Roy. The series will explore Roy's life, success, controversies, and downfall, following the success of previous 'Scam' series.