Farzi Trailer: इतना पैसा कमाना है की मुझे...; पाहा, शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा जबरदस्त ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:43 IST2023-01-13T16:41:19+5:302023-01-13T16:43:01+5:30
Shahid Kapoor-Vijay Sethupathi Farzi : काही क्षणांपूर्वी ‘फर्जी’चा ट्रेलर रिलीज झाला. यात शाहिद धमाकेदार ॲक्शन करताना दिसत आहे. शिवाय विजय सेतुपती देखील धम्माल भूमिकेत आहे.

Farzi Trailer: इतना पैसा कमाना है की मुझे...; पाहा, शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा जबरदस्त ट्रेलर
कबीर सिंग, जब वी मेट, विवाह असे शानदार सिनेमे देणारा शाहिद कपूर (Shahid Kapoor) आता ओटीटीच्या दुनियेत डेब्यू करतोय. होय, त्याची पहिलीवहिली वेब सीरिज ‘फर्जी’ (Farzi) येत्या १० फेब्रुवारीला स्ट्रीम होणार आहे. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये शाहिद कपूरसोबत साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही (Vijay Sethupathi ) दमदार भूमिकेत दिसणार आहे.
तर काही क्षणांपूर्वी ‘फर्जी’चा ट्रेलर रिलीज झाला. यात शाहिद धमाकेदार ॲक्शन करताना दिसत आहे. शाहिद बनावट नोटा तयार करणाऱ्या एका तरूणाच्या भूमिकत आहे तर विजय एक पोलिस अधिकारी आहे. बनावट नोटा तयार करून आपण श्रीमंत होऊ शकतो, असा विचार शाहिदच्या मनात येतो आणि तो कामाला लागताे. त्याला पकडण्यासाठी विजय सेतुपतीची एन्ट्री होते. शाहिद आणि विजय सेतुपती एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. ट्रेलरच्या सुरुवातीला शाहिदवर नोटांचा वर्षाव होताना दिसतो. 'पैसों से खुशियां नहीं खरीद सकते, ये डायलॉग सिर्फ वो लोग मारते हैं, जिनके पास पैसे होते ही नहीं है...' असा डायलॉग ऐकू येतो.
मैं इतना पैसा कमाना चाहता हू की उसकी इज्जत ना करनी पडी, सबके अंदर चोर है सिर्फ चान्स का वेट करता है... हे ट्रेलरमधील डायलॉग लक्ष वेधून घेतात. 'फर्जी'मध्ये के के मेनन, राशी खन्ना, अमोल पालेकर यांच्याही भूमिका आहेत. द फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज डीके राज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ॲमेझॉन प्राईमवर ही सीरिज बघता येणार आहे.