Vanita Kharat Glamorous Look Viral |‘कोळीवाड्याची रेखा’ वनिताचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:17 IST2021-09-07T14:17:16+5:302021-09-07T14:17:44+5:30
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री वनिता खरात. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून देखील वनिताची ओळख आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील आपल्या विनोदाच्या युनिक टायमिंगने तिने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. काही महिन्यांपूर्वी तिने केलेल्या न्यूड फोटोशुटमुळे ती बरीच चर्चेत होती. आता ती आणखी एका ग्लॅमरस फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या नवीन फोटोशूटमध्ये ती ब्युटी इन ब्लॅक अंदाजात पाहायला मिळतेय. तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे ती हटके स्टाईलमध्ये आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटोज सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटे चाहत्यांना खूपच पसंतील पडले असून या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.