Navratri Mahotsav 2021 | अन्विता आणि मायराने अशी केली नवरात्रीची सुरवात | Anvita | Myra Vaikul
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:09 IST2021-10-08T18:08:57+5:302021-10-08T18:09:13+5:30
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या आहेत. यातील स्विटू आणि परी या संपूर्ण महाराष्ट्राच्या फेवरेट आहेत. नुकत्याच दोघीही नवरात्री निमित्त एकत्र आलेल्या दिसून आल्यात. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. नुकतीच तिने परी म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ हिच्यासोबत एक फोटो अपलोड केला आहेत. या फोटोमध्ये अन्विता आणि मायरा दोघीही मोठी स्माइल देताना दिसून येतायेत. तसेच नवरात्रीच्या पाहिल्या दिवसांचा रंग पिवळा असल्याने दोघींनीही पिवळ्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते आणि फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अन्विताने ‘येलो जी’ असं कॅप्शन दिलाय.