VIDEO: जबरदस्त हॉलिवूड स्टाईल 'रणवीर चिंग रिटर्न्स'

By Admin | Updated: August 11, 2016 10:58 IST2016-08-11T10:58:06+5:302016-08-11T10:58:06+5:30

रणीवर सिंग आणि रोहित शेट्टी 'रणवीर चिंग रिटर्न्स' जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र येणार असून खाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या तोडीची ही जाहिरात बनवण्यात आली आहे

VIDEO: Great Hollywood Style 'Ranvir Ching Returns' | VIDEO: जबरदस्त हॉलिवूड स्टाईल 'रणवीर चिंग रिटर्न्स'

VIDEO: जबरदस्त हॉलिवूड स्टाईल 'रणवीर चिंग रिटर्न्स'

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 11 - अभिनेता रणीवर सिंगने काही दिवसांपुर्वी एक पोस्टर शेअर करुन रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याचं सांगितलं होतं. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्कंठा प्रचंड वाढली होती. रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग एकत्र येणार असल्याने एकदम धम्माल चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं काही नसून दोघेही एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पण एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या तोडीची ही जाहिरात बनवण्यात आली आहे. 'रणवीर चिंग रिटर्न्स' म्हणून ही अॅड कॅम्पेन करण्यात आली आहे. 19 ऑगस्टला ही जाहिरात रिलीज करण्यात येणार आहे. 
 
रणवीर चिंग रिटर्न्स हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट असून अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणा-या रोहित शेट्टीने या जाहिरातीचं दिग्दर्शन केलं आहे. ही जाहिरात पाहून तुम्हाला हॉलिवूडचा ऑस्कर विजेता 'मॅड मॅक्स' चित्रपट नक्की आठवेल. जाहिरातीत रणवीरचा फुल ऑन ग्लॅडिएटर लूक पाहायला मिळत आहे. रणवीर सिंगसोबत या जाहिरातीत अभिनेत्री तमन्नादेखील झळकणार आहे. रणवीर सिंग आणि तमन्नाची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. 
 
जगातील अन्नाच्या तुटवड्यामुळे लोक त्रस्त झालेले असतानाच रक्षणकर्त्याच्या रुपात आलेला रणवीर सिंग त्यांना मदत करणार आहे, असे या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे. रणवीर सिंगने ट्विटरच्या माध्यमातून या जाहिरातीचा ट्रेलर शेअर केला आहे.
 

Web Title: VIDEO: Great Hollywood Style 'Ranvir Ching Returns'