शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:45 AM2023-12-28T11:45:21+5:302023-12-28T11:46:03+5:30
विकीसोबत तापसी पन्नू अन् राजकुमार रावही लपून राहिले
![Vicky Kaushal hides behind the curtains with tapasee and rajkumar rao in Shahrukh Khan s Mannat | शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय? Vicky Kaushal hides behind the curtains with tapasee and rajkumar rao in Shahrukh Khan s Mannat | शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/mann_2023121147417.jpg)
शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचं (Vicky Kaushal) सध्या सगळीकडेच कौतुक होतंय. 'सॅम बहादुर' सिनेमातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. शिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या 'डंकी' सिनेमात त्याने केवळ स्पेशल अॅपिअरन्स केला असला तरी तोही प्रेक्षकांना भावला. या सिनेमातून त्याला शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. नुकतंच विकीने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातील एक किस्सा सांगितला. मन्नत बंगल्यात आयोजित पार्टीत विकीला संपूर्ण संध्याकाळ एका पडद्यामागे कोपऱ्यात घालवावी लागली यामागे नक्की काय कारण होतं हे त्याने सांगितलं.
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात एकदा पार्टी होती. यामध्ये चुकीचा ड्रेस कोड असल्याने विकी कौशल, राजकुमार राव आणि तापसी पन्नू तिघांना पार्टीत पूर्ण वेळ एका कोपऱ्यात बसावे लागले. याचा खुलासा करताना विकी म्हणाला,'शाहरुख सरांनी मला फोन करुन त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण दिले होते. काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता तर डिनरचं आयोजन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मी पहिल्यांदाच मन्नतमध्ये जाणार होतो आणि हा त्यांच्या वाढदिवसाचा समारोह असल्याने मी खूश होतो. पार्टीत मी अगदीच कॅज्युअल लूकमध्ये गेलो.'
तो पुढे म्हणाला,'मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा करीना कपूर खआन, मलायका अरोरासह इतर सर्वच जण अगदी फॅन्सी आणि ट्रेडिशनल लूकमध्ये आल्या होत्या. मी, तापसी आणि राजकुमार राव असे आम्ही तीन चार जण वाढदिवसाची पार्टी समजून कॅज्युअल लूकमध्ये होतो. नंतर आम्हाला कळलं की ही तर दिवाळी पार्टी होती. आम्ही पूर्ण पार्टीत पडद्यामागे एका कोपऱ्यातच फिरत होतो.'