"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:14 IST2025-12-20T10:14:23+5:302025-12-20T10:14:45+5:30
अभिनयापेक्षा आता मी डायपर बदलण्यात जास्त..., विकी कौशलची मजेशीर प्रतिक्रिया

"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
अभिनेता विकी कौशल सध्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा 'छावा' हा सिनेमा सुपरहिट झाला. आता तो संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात विकी बाबा झाला आहे. कतरिना कैफने गेल्या महिन्यातच एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाबा झाल्यानंतरचं आयुष्य कसं आहे यावर नुकतीच विकी कौशलने प्रतिक्रिया दिली.
'एनडीटीव्ही'च्या इव्हेंटमध्ये विकी कौशलला प्रश्न विचारण्यात आला की, 'अभिनय आणि डान्समध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर आता डायपर बदलणंही शिकला आहेस का?' यावर विकी कौशल हसतच म्हणाला, "मी आता अभिनयापेक्षाही डायपर बदलण्यात जास्त हुशार झालो आहे. सध्या इतकंच सांगू शकतो."
बाबा झाल्यानंतर भावनिक प्रतिक्रिया देत तो पुढे म्हणाला, "पहिल्यांदा मी लेकाला सोडून शहराच्या बाहेर आलो आहे. हे खूप कठीण आहे. पण एक दिवस जेव्हा तो हे बघेल तेव्हा त्याला आपल्या वडिलांचा गर्व असेल. बाबा झाल्याची भावना मी शब्दात व्यक्त करु शकत नाही."
विकी कौशल दिल्लीतील एनडीटीव्हीच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. कतरिना कैफने ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. विकी आणि कतरिनाने अद्याप लेकाचं नाव रिव्हील केलेलं नाही. दोघंही पालकत्वाचा आनंद घेत आहेत. तर दुसरीकडे विकीच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.