सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:59 IST2025-10-29T10:58:50+5:302025-10-29T10:59:31+5:30
Yogita Chavan And Saurabh Chaughule Separation: 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याचं नुकतंच समोर आलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं आणि लग्नाचे फोटोदेखील डिलीट केले होते. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर धरला. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून कलाकारांचे घटस्फोट चर्चेत आले आहेत. ज्यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याचं नुकतंच समोर आलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं आणि लग्नाचे फोटोदेखील डिलीट केले होते. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर धरला. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.
सौरभ चौघुलेसोबत विभक्त झाल्याच्या चर्चांवर योगिता चव्हाणने अखेर मौन सोडले आहे. न्यूज १८ लोकमतच्या रिपोर्ट्सनुसार, योगिता चव्हाणसोबत संपर्क साधून तिला या चर्चांबद्दल विचारण्यात आले. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही बोलायचं नाही आहे. तर सौरभशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. योगिताच्या या उत्तरामुळे ते दोघे खरंच वेगळे झाल्याचे समजते आहे.
योगिता म्हणाली...
योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची भेट जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवर झाली होती आणि तिथेच त्यांच्यात प्रेम फुलले. ही मालिका संपल्यानंतर मार्च, २०२४मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. तसेच एकमेकांसोबतचे फोटोदेखील डिलीट केले. याशिवाय ते वेगळे राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता या चर्चांवर योगिताने प्रतिक्रिया देणं टाळल्यामुळे अखेर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.