टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रीचं झालं डोहाळेजेवण, पतीसोबत 'कोई मिल गया' गाण्यावर केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:56 IST2025-05-21T08:56:21+5:302025-05-21T08:56:40+5:30

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळेजेवण झालं असून अभिनेत्रीने पतीसोबत खास गाण्यावर डान्स केलाय. अभिनेत्रीच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली आहे

yeh hai mohabbatein actress shireen mirza baby shower video viral dance koi mil gaya song | टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रीचं झालं डोहाळेजेवण, पतीसोबत 'कोई मिल गया' गाण्यावर केला डान्स

टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रीचं झालं डोहाळेजेवण, पतीसोबत 'कोई मिल गया' गाण्यावर केला डान्स

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे शिरीन मिर्झा. 'ये है मोहब्बतें' मालिकेत 'सिम्मी भल्ला'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीन मिर्झा लवकरच आई होणार आहे. शिरीनचा पती हसन सरताजने तिच्यासाठी खास बेबी शॉवरचे आयोजन केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिरीनच्या या खास डोहाळेजेवणाला तिचा पती आणि तिच्या मैत्रिणींनी 'कोई मिल गया' गाण्यावर डान्स केला. 

शिरीनचं डोहाळेजेवण

शिरीनने या खास प्रसंगी क्रीम रंगाचा गाऊन परिधान केला होता. यशिवाय तिच्या मित्रमंडळींनी पांढऱ्या व पेस्टल रंगाच्या कपड्यांमध्ये हजेरी लावली होती. याशिवाय शाहरुखच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातील 'कोई मिल गया' या गाण्यावर शिरीन आणि हसन या पती-पत्नीने एकत्र डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ शिरीनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, "मित्रांच्या प्रेमाने भरलेली आमची रुम. होणारं बाळ आणि मी तुमच्या प्रेमाने खूप भारावून गेलो आहोत." शिरीनचा हा व्हिडीओ समोर येताच लोकांनी तिचं कौतुक केलं आहे. याशिवाय होणारं बाळ आणि ती निरोगी राहावी, यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.


शिरीन आणि हसन यांचा विवाह २०२१ मध्ये जयपूरमध्ये पारंपरिक निकाह पद्धतीने झाला होता. एप्रिल २०२५ मध्ये शिरीनने आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. शिरीन आणि सरताजने शेतात फोटोशूट करुन कॅप्शन लिहिलं होतं की, "आल्लाहने योग्य वेळी आमच्या प्रार्थनांना प्रतिसाद दिला. त्याने आमच्या प्रार्थना ऐकल्या. त्याचा आणि माझा अंश असलेला छोटा पाहुणा आकार घेत आहे. आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे. पालक होणार असल्याने आम्ही आणखी प्रार्थना करत आहोत. अल्लाह आमच्या बाळाचं रक्षण कर. आणि त्याला वाढवण्यासाठी आम्हाला योग्य रस्ता दाखव". 

Web Title: yeh hai mohabbatein actress shireen mirza baby shower video viral dance koi mil gaya song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.