​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2017 05:52 AM2017-04-08T05:52:02+5:302017-04-08T11:22:02+5:30

क्या कसूर है अमला का या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत साकारत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर ...

What's wrong is that Amla's fame has left her wingless Awasthi's house | ​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर

​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर

googlenewsNext
या कसूर है अमला का या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत साकारत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर आधारित आहे. या मालिकेत साध्याभोळ्या अमलाचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत असल्याने तिचे कमीतकमी दहा-बारा तास चित्रीकरणात जातात. ही मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी मालिकेची संपूर्ण टीम रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत आहे. पंखुरी तर भूमिका चांगली व्हावी यासाठी भूमिकेचा अभ्यासदेखील करत आहे. पंखुरी तिच्या आई वडिलांसोबत गेल्या कित्येक महिन्यांपासून वांद्रे येथे राहात आहे. तर तिच्या मालिकेचा सेट हा गोरेगाव परिसरात आहे. त्यामुळे तिला सेटवर पोहोचायला आणि सेटवरून घरी जायला खूपच वेळ लागत होता. तिचे अनेक तास प्रवासात जात असल्याने ती खूपच थकत असे. रोजच्या प्रवासाचा तिला कंटाळाच आला होता. त्यामुळे पंखुरीने आता कांदिवली परिसरात एक फ्लॅट घेतला असून तिथे ती एकटी राहात आहे. पंखुरी अनेक वर्षांपासून पालकांसोबतच राहात असल्याने तिने घर सोडल्यावर तिच्या पालकांना वाईट वाटले आहे का असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर यावर पंखुरी सांगते, "क्या कसूर है अमला का या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारत असल्याने माझ्यावर कामाचा प्रचंड त्राण येतो आणि त्यात प्रवासालादेखील अनेक तास लागत असल्याने मी वांद्र्यावरून कांदिवलीला शिफ्ट व्हायचे ठरवले. या माझ्या नव्या घरापासून सेट जवळ असल्याने माझ्यासाठी प्रवास सोईस्कर झाला आहे." 

Web Title: What's wrong is that Amla's fame has left her wingless Awasthi's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.