दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 19:30 IST2024-05-14T19:30:00+5:302024-05-14T19:30:00+5:30
Vishakha subhedar: विशाखाने कोणतंही रील सोशल मीडियावर शेअर केलं की ते वाऱ्यासारखं व्हायरल होतं.

दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल
विशाखा सुभेदार (vishakha subhedar) 'बस नाम ही काफी हैं'.. विनोदी भूमिका असो वा खलनायिका, प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून ती काम करते. त्यामुळेच तिचा अभिनय थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांची भेट घेत असते. यात अलिकडेच तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
विशाखा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा फावल्या वेळात वेगवेगळ्या गाण्यावर रील्स करत असते. तिचे हे रील्स सोशल मीडियावरही वाऱ्यासारखे व्हायरल होतात. यात खासकरुन तिच्या एक्स्प्रेशन्सचं सगळेच जण कौतुक करतात.
नुकताच विशाखाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ओम शांती ओम या सिनेमातील दीपिका पदुकोणवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यावर तिने रील केलं आहे. या गाण्यात तिने दिलेले एक्स्प्रेशन्स नेटकऱ्यांना भलतेच आवडले आहेत. त्यामुळे सध्या ते या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.