लाडकी मैत्रीण नम्रतासाठी वनिता खरातची खास पोस्ट, कॉमेडी क्वीनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:25 IST2023-08-29T14:22:44+5:302023-08-29T14:25:56+5:30
नम्रताच्या वाढदिवसानिमित्त वनिता खरातने खास पोस्ट लिहिली आहे.

Vanita Kharat - Namrata Sambherao
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. प्रेक्षकही तिला भरभरून प्रेम देतात. नम्रता संभेराव ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नम्रताच्या वाढदिवसानिमित्त वनिता खरातने खास पोस्ट लिहिली आहे.
वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नम्रताबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा टॅलेंट हाऊस, तुझ्या पिटाऱ्यातून नवनवीन पात्र येत राहूदे…लव्ह यू" असं वनिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नम्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघींनी एकमेकींना मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रियदर्शनी इंदलकरने नम्रताचा बॅटिंग करतानाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नमा ताई! अशीच तुफान बॅटिंग करत रहा!” असे कॅप्शन तिने दिले.
नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील तिची अनेक पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. अनेकदा तिचे या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.