दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 19:01 IST2022-07-10T18:59:54+5:302022-07-10T19:01:07+5:30
Rang maza wegla: दु:ख, संताप एकत्र धुमसत असल्यामुळे दिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?
छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla) या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आल्याचं दिसून येत आहे. दिपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य दिपासमोर आलं आहे. त्यामुळे इतके वर्ष सौंदर्याने आपल्या लेकीचं सत्य लपवून ठेवल्यामुळे दिपा दु:खी झाली आहे. परंतु, दु:ख, संताप एकत्र धुमसत असल्यामुळे दिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिपिकाला मिळवण्यासाठी दिपाने कोर्टात धाव घेतली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिक दिपाकडे जाऊन दिपिकाला मी तुझ्यासोबत राहू देणार नाही. त्यामुळे तिला परत पाठव असं सांगतो. मात्र, संतापलेल्या दिपाने काहीही झालं तरीदेखील दिपिकाला पुन्हा त्या घरात पाठवणार नाही असं ठणकावून सांगते.
दरम्यान, दिपा आणि कार्तिकच्या वादात दिपिका आपली सख्खी बहीण असल्याचं कार्तिकीला समजतं. त्यामुळे ती दिपावर प्रश्नांचा भडीमार करते.एकीकडे दिपा, कार्तिकीच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं टाळते. तर, दुसरीकडे दिपिकाला मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा विचार करते. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.