आरती सिंहने दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; आमिर म्हणाला, 'अजय देवगणच दिसतोय...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:55 IST2024-02-14T15:54:08+5:302024-02-14T15:55:13+5:30
Arti Singh: ३८ वर्षीय आरतीने आज व्हॅलेंटाईन डे ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

आरती सिंहने दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; आमिर म्हणाला, 'अजय देवगणच दिसतोय...'
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर तिने होणाऱ्या नवऱ्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर अनेक कलाकारांनी कमेंट्स कर पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तसंच चाहत्यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची ती बहीण आहे तर हे दोघंही अभिनेता गोविंदाचे भाचे आहेत. आरतीच्या लग्नात गोविंदा येणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
३८ वर्षीय आरतीने आज व्हॅलेंटाईन डे ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यामध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा बाजूने दिसत आहे तर ती त्याच्याकडे हसत बघत आहे. काही दिवसांपूर्वी आरती काश्मीरला फिरण्यासाठी गेली होती. बर्फाळ वातावरणात तिचा होणाऱ्या नवऱ्यासोबतचा हा कँडिड फोटो आहे. यासोबत तिने लिहिले, 'जिसका मुझे था इंतजार...!'
आरतीच्या या पोस्टवर अभिनेत्री बिपाशा बासूने कमेंट करत लिहिले, 'सो क्यूट'. तर टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला, 'साईड प्रोफाईलवरुन अजय देवगण..!' अंकिता लोखंडेनेही कमेंट करत लिहिले, 'अभिनंदन मेरी जान, हमे भी था इंतजार'.
आरतीचा मामा बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद तर सर्वांनाच माहित आहे. दोघांचं आपापसात पटत नाही. तरी आरतीच्या लग्नात गोविंदा येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आरती डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून तिचं लग्न मुंबईतच असणार आहे.