​माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:32 IST2017-12-04T07:02:16+5:302017-12-04T12:32:16+5:30

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गुरूनाथ म्हणजेच गॅरी, शनाया, राधिका ...

This is the turn of my husband's wife to this series | ​माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला मिळणार हे वळण

​माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला मिळणार हे वळण

झ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गुरूनाथ म्हणजेच गॅरी, शनाया, राधिका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडतात. ही मालिका दिवसेंदिवस चांगलीच लोकप्रिय होत आहे. या मालिकेत राधिका आणि गुरूनाथ हे पती-पत्नी असून शनाया ही गुरूनाथची प्रेयसी आहे. या मालिकेत राधिका ही अतिशय साधीसुधी तर शनाया ही अतिशय फॅशनेबल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक नवीन वळण मिळणार आहे. 
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिका आता आपल्यात कमालीचा बदल घडवून आणणार आहे. राधिका नेहमीच आपल्याला साडीमध्ये दिसते. तसेच ती साधी गृहिणी असून तिच्यासाठी तिचे कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. ती तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देते. पण आता राधिकाच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा बदल होणार असून प्रेक्षकांना या नव्या रूपातील राधिका नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया गुरुनाथला ज्याप्रकारे गॅरी ही हाक मारते, हे सगळ्यांनाच आवडते. आता प्रेक्षकांना या मालिकेत शनाया नव्हे तर राधिका गुरूनाथला गॅरी अशी हाक मारताना पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शनाया पूर्णपणे बदलणार आहे. शनाया नेहमीच तिच्या दिसण्याला, तिच्या मेकअपला महत्त्व देते. कुटुंब ही संकल्पना कधीच तिच्या पचनी पडणारी नाहीये, पण आता शनाया तिचे नखरे विसरून राधिकाप्रमाणे घरची जबाबदारी उचलताना दिसणार आहे. 
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत आता शनाया राधिकासारखी तर राधिका शनायासारखी वागताना आपल्याला दिसणार आहे. मालिकेच्या कथानकाला मिळालेली ही कलाटणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रसिका सुनील शनाया, अनिता दाते राधिका तर अभिजीत खांडकेकर गुरूनाथची भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Also Read : माझ्या नवऱ्याची बायको फेम ​रसिका सुनीलने घेतली आयुष्यातील पहिली गाडी

Web Title: This is the turn of my husband's wife to this series