तुनिषा आत्महत्या प्रकरणी तपासाने घेतला वेग, शिजानच्या 'त्या' सीक्रेट गर्लफ्रेंडला पोलिसांनी काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:44 AM2022-12-28T11:44:53+5:302022-12-28T12:56:00+5:30

शिजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचं तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का?, याचा तपास पोलीस करतायेत.

Tunisha Sharma suicide case accused Sheezan khan having secret girlfriend police confirmed | तुनिषा आत्महत्या प्रकरणी तपासाने घेतला वेग, शिजानच्या 'त्या' सीक्रेट गर्लफ्रेंडला पोलिसांनी काढले शोधून

तुनिषा आत्महत्या प्रकरणी तपासाने घेतला वेग, शिजानच्या 'त्या' सीक्रेट गर्लफ्रेंडला पोलिसांनी काढले शोधून

googlenewsNext

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिस शिजानची सतत चौकशी करत आहेत. शिजानच्या चौकशीच्या आधारे पोलीस अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. यादरम्यान शिजनची सीक्रेट गर्लफ्रेंड असल्याचेही समोर आले. दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वालीव पोलिसांनी शिजनची सीक्रेट गर्लफ्रेंड असल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची ओळख पटली आहे. मात्र, अद्याप तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. कोठडीत असताना शिजानची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीची नंतर चौकशी केली जाईल. शिजानच्या आईचा जबाबही नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आता शिजानच्या जुन्या डिलीट केलेल्या चॅट्स आणि सीक्रेट गर्लफ्रेंडचं चॅट्स परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी सेटवरील शूटचा डीव्हीआरही ताब्यात घेतला आहे.  पोलिस शूटींग दरम्यान असे काही आहे की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करतील जे चेहऱ्यावरील हावभावांवरून समजू शकेल. वालीव पोलिसांनी रॉ फुटेजही आपल्या ताब्यात घेतले आहे. यामध्ये, शूटिंगदरम्यान प्रत्येक शॉट देण्यासाठी शिजान आणि तुनिषा यांनी किती टेक घेतले हे पोलिस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.


तुनिषानं २४ डिसेंबरला केली होती आत्महत्या 
तुनिषाने २४ डिसेंबर २०२२च्या शनिवारी 'अलीबाब:दास्ताने कुबूल'च्या सेटवर आपला सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिजान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या आईनं तुनिषाला शिजाननं आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी शिजानला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पोलिस शिजानची चौकशी करत असून या प्रकरणाचा कसून तपासही करत आहेत.


 

Web Title: Tunisha Sharma suicide case accused Sheezan khan having secret girlfriend police confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.