Dhanashri Kadgaonkar : डोक्यात काय फॉल्टय काय? वहिनी साहेबांची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:39 PM2022-07-04T14:39:23+5:302022-07-04T14:41:01+5:30

Dhanashri Kadgaonkar : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिनी वहिनी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेबांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या डोक्यात आहेत. कोल्हापूरकर तर वहिनीसाहेबांच्या डायलॉगवर फिदा आहेत....

tujhyat jeev rangla fame dhanashree kadgaonkar dialog grafity t-shirt | Dhanashri Kadgaonkar : डोक्यात काय फॉल्टय काय? वहिनी साहेबांची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट

Dhanashri Kadgaonkar : डोक्यात काय फॉल्टय काय? वहिनी साहेबांची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट

googlenewsNext

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’  ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेत  नंदिनी वहिनी साहेबांची ( Vahini Saheb) भूमिका साकारून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर ( Dhanashri Kadgaonkar) . या मालिकेतील वहिनी साहेबांचा गावरान ठसका म्हणजे लाजवाब. त्यामुळेच मालिका संपूर्ण बरेच दिवस झाले असले तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही.

वहिनी साहेबांच्या तोंडचे कडक डायलॉग तर अद्यापही प्रेक्षकांना चांगलेच आठवणीत आहेत. चाहते तिच्या डायलॉगवर फिदा आहेत. विशेषत: कोल्हापूरकर मंडळी वहिनी साहेबांच्या डायलॉगच्या जरा जास्तच प्रेमात आहेत. आता या प्रेमाची उतराई तर व्हायलाच हवी. त्यामुळे वहिनी साहेबांनी खास कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  

डोक्यात काय फॉल्टय काय? , हा नंदिनी वहिनींचा डायलॉग प्रचंड गाजला. कोल्हापूरकरांसाठी तर हा डायलॉग फारच खास आणि आवडता आहे. चाहत्यांच्या आणि विशेष: कोल्हापूरकरांच्या प्रेमाखातर धनश्रीनं ‘डोक्यात काय फॉल्टय काय? , असं लिहिलेला कॅलिग्राफी टी-शर्टच बनवला आहे.
धनश्रीनं कॅलिग्राफी टी-शर्ट घालून झक्कास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते सुद्धा फक्त आणि फक्त कोल्हापूरकर मंडळींसाठी.
‘व्हय की व्हय लिटिल लिटिल फॉल्ट हाईच खरं आमच्या डोस्क्यात... अजूनही हा डायलॉग आठवणीत ठेवणाºया प्रत्येक कोल्हापुरकरांसाठी ही पोस्ट,’असं धनश्रीनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  

साहजिकच धनश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. खूप छान वहिनी साहेब, कडक अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

 सध्या धनश्री तिच्या लेकाला कबीरला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तिचा कलाविश्वातील वावर किंचितसा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम तिच्याविषयीचे अपडेट शेअर करत असते.  

Web Title: tujhyat jeev rangla fame dhanashree kadgaonkar dialog grafity t-shirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.