रस्त्यावरच्या नळावर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:38 IST2023-09-01T16:37:54+5:302023-09-01T16:38:15+5:30
Video : 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्यावर आली रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ, तुम्ही ओळखलं का?

रस्त्यावरच्या नळावर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, व्हिडिओ व्हायरल
'द कपिल शर्मा शो'मध्ये गुत्थी, डॉ. गुलाटी, रिंकु देवी अशा भूमिका साकारुन अभिनेता सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या शोमधून तो घराघरात पोहोचला. परंतु, कपिल शर्माबरोबर वाद झाल्याने त्याने शोला रामराम केला होता. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सुनिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सुनिल ग्रोव्हर अनेक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये सुनिल रस्त्यावरच्या नळावर कपडे धुताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने 'माझी आवडती गोष्ट करताना", असं कॅप्शन दिलं आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
शाहरुख खानच्या 'जवान'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू; एका तिकिटासाठी मोजावे लागणार 'इतके' हजार रुपये
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मानेही सुनिल ग्रोव्हरच्या व्हिडिओवर कमेंटही केली आहे. "वॉव सफेदीची चमक, कोणता साबण?" असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. सुनिल अनेकदा असे हटके व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. मागे त्याने कणीस आणि छत्र्या विकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. पण, त्याच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी
दरम्यान, सुनील ग्रोव्हरने हिंदीबरोबरच अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केलं आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘मै हूं ना’, ‘गजनी’, ‘हिरोपंती’, ‘बाघी’, ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटांत तो दिसला होता. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.