'हम है राही प्यार के' मधील सुपरहिट गाण्यावर 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली, कुसुमताईचा जबरदस्त डान्स; मधुभाऊही थिरकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:00 IST2024-12-31T17:58:21+5:302024-12-31T18:00:54+5:30

अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

tharla tar mag serial starcast sayali kusum tai and madhubhau dance on aamir khan hum hai raahi pyaar ke movie song video viral | 'हम है राही प्यार के' मधील सुपरहिट गाण्यावर 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली, कुसुमताईचा जबरदस्त डान्स; मधुभाऊही थिरकले

'हम है राही प्यार के' मधील सुपरहिट गाण्यावर 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली, कुसुमताईचा जबरदस्त डान्स; मधुभाऊही थिरकले

Tharala Tar Mag Starcast Dance:  जवळपास ३० वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हम है राही प्यार के हा सिनेमा प्रचंड गाजला. या चित्रपटाती कलाकार त्यांनी अभिनय आणि गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आज इतकी वर्षे होऊनही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. दरम्यान, या चित्रपटातील 'मुंबई से गयी पुना...' या गाण्याने सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं. दरम्यान, या लोकप्रिय गाण्यावर स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतील कलाकारांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.


छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' या मालिकेत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीसह (Jui Gadkari) तिचे सहकलाकार कुसुमताई आणि मधुभाऊ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे तिघेजण आमिर खानच्या 'हम है राही प्यार के' चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. २०२४ वर्ष हे आमच्यासाठी असं होतं... असं कॅप्शन देत जुई गडकरीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. व्हिडीओमधील सायली, कुसुमताई आणि मधुभाऊ यांची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर अभिनेता चैतन्य सरदेशपांडे आणि केतकी विलास या कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेप्रमाणे त्यातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शिवाय टीआरपीच्या शर्यतीत सलग दोन वर्षे आघाडीवर असल्याने या मालिकेची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. 

Web Title: tharla tar mag serial starcast sayali kusum tai and madhubhau dance on aamir khan hum hai raahi pyaar ke movie song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.