ठरलं तर मग! अखेर अर्जुन-सायलीचं लग्न होणार; प्रतिमा मागे घेणार 'हे' मोठं वचन, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:05 IST2025-02-14T18:01:33+5:302025-02-14T18:05:01+5:30
'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

ठरलं तर मग! अखेर अर्जुन-सायलीचं लग्न होणार; प्रतिमा मागे घेणार 'हे' मोठं वचन, पाहा प्रोमो
Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेत अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. परंतु सायलीने अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ द्यायचं नाही हे मनाशी पक्कं ठरवलंय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मीच अर्जुनसरांसोबत लग्न करणार या निर्णयावर ती ठाम आहे. पण, ऐकणार ती तन्वी कुठली? सायलीला अर्जुनपासून लांब करण्याची कोणतीही संधी ती सोडत नाही. या लबाड तन्वीला सायलीने आता तिच्या स्टाईलने इंगा दाखवला आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील सुखावले आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सायली-अर्जुनचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे मालिकेचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. शर्थीचे प्रयत्न करुन सायलीला लग्नमंडपात येऊ न देण्यासाठी प्रियाने बरेच प्लॅन केलेले असतात. पण, सायलीदेखील अतिशय हुशारीने बॅण्डवाल्याचा पेहरावर करुन लग्नमंडपात एन्ट्री करते आणि हे लग्न थांबवते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, प्रतिमा पूर्णा आजीला म्हणते- "अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं जे वचन मला आठवतही नाही त्या वचनातून मी तुम्हाला मुक्त करते." पुढे अर्जुन पूर्णा आजीला ठामपणे सांगतो, "प्रतिमा आत्याने आताच तुला माझ्या आणि तन्वीच्या लग्नाच्या वचनातून मुक्त केलं आहे. आता मला सुद्धा माझ्या सात जन्माच्या लग्नाचं वचन निभावूदे."
दरम्यान, अर्जुन-सायलीने पुन्हा एकत्र यावं ही प्रेक्षकांची इच्छा आहे. अखेर प्रेक्षक ज्या दिवसाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते तो क्षण आता जवळ आला आहे. लवकरच मालिकेत अर्जुन-सायलीचं लग्न होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. परंतु हे सत्य असणार की अर्जून स्वप्न पाहतो आहे, हे मालिका पाहिल्यानंतरच समजेल.