"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 09:14 IST2025-08-17T09:13:24+5:302025-08-17T09:14:07+5:30

'ठरलं तर मग' मालिकेच्या कलाकारांनी ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर भावुक पोस्ट शेअर करुन त्यांची आठवण जागवली आहे

tharla tar mag actors jui gadkari amit bhanushali monika dabade post on jyoti chandekar death | "तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले

"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. वयाच्या ६९ व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती यांची मुलगी. आईच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली. ज्योती सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनय करत होत्या. ज्योती यांच्या निधनामुळे  'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांना मोठा धक्का बसला. कलाकारांनी भावुक पोस्ट लिहून ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांच्या भावुक पोस्ट 

'ठरलं तर मग' मालिकेतील सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन लिहिलं की, हे स्वीकार होऊ शकत नाही. तू फसवलंस आजी

 

'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन अर्थात अभिनेता अमित भानुशालीने भावुक पोस्ट लिहिली आहे. अमितने फोटो शेअर करुन ज्योती चांदेकर यांच्याविषयी लिहिलंय की, "खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस — ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तुझा हसरा चेहरा, तुझा उत्साह, आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील. शांती लाभो आजी… तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन."




'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्री मोनिका दबडेने तिच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केलाय. तिची लेक ज्योती चांदेकर यांच्या मांडीवर बसली आहे. हा फोटो पोस्ट करुन मोनिका लिहिते, " आहेस ...!! माझ्या आणि वृंदा सोबत ..!! I love you and will miss you..!! माझी पूर्णाआजी ..!!!"




याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही ज्योती चांदेकर यांच्याविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे. त्या लिहितात, "अजूनही विश्वास बसत नाही, ज्योती ताई, की तू आता आमच्या सोबत नाहीस... तुझी बातमी ऐकली आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. डोळ्यांसमोर केवळ तुझा हसरा चेहरा, तुझं मनमिळावूपण, आणि आपण एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण फिरत राहिले. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवण आता हृदयात कोरल्यासारखी राहून गेलीय.  अस वाटतंय की कालच तर आपण एकत्र होतो... हसत होतो, बोलत होतो... आणि आज तू इतक्या लांब गेलीस की परत कधीच भेट होणार नाही. तुझी कमतरता सतत जाणवत राहील, पण तू आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो."




 

Web Title: tharla tar mag actors jui gadkari amit bhanushali monika dabade post on jyoti chandekar death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.