दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:55 IST2025-01-30T16:53:53+5:302025-01-30T16:55:56+5:30
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हा हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, नेटकरी म्हणाले...
Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हा हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'साथ निभाना साथियॉं' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेने खऱ्या अर्थाने देवोलिनाला खरा स्टारडम मिळवून दिला. अलिकडेच अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देवोलिना भट्टाचार्जीने गोंडस मुलाला जन्म दिलाय. त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये येत आहे. दरम्यान, देवोलिना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या दीड महिन्यांच्या मुलाला घेऊन सिद्धीविनायच्या चरणी नतमस्तक झाली आहे. सोशल मीडियावर याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
नुकतीच देवोलिना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. या फोटोंमध्ये अभिनेत्रीसोबत तिचं चिमुकल्या बाळं देखील दिसत आहे. "जय गजानन, श्री गजानन..." असं कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर कलाकारांसह नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने १८ डिसेंबर २०२४ रोजी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती. अलिकडेच मुलांच्या जन्मानंतर देवोलिना भट्टाचार्जीने त्याचं नामकरण केलं आहे. देवोलिना तिच्या मुलाचं नाव 'जॉय' ठेवलं आहे.
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती. आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.