तेजस्विणी लोणारीच्या ठसठशीत पारंपरिक मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:42 IST2025-12-05T12:27:27+5:302025-12-05T13:42:28+5:30
पारंपरिकतेचा नवा साज! समाधान यांनी तेजस्विनीच्या गळ्यात घातले आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र चर्चेत!

तेजस्विणी लोणारीच्या ठसठशीत पारंपरिक मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का? व्हिडीओ व्हायरल
Tejaswini Lonari Mangalsutra Vati Design : लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध… प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे.अशातच आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लग्नबंधनात अडकली. तेजस्विनीने शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपूत्र आणि युवानेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. मुंबईत तेजस्विनी आणि समाधान यांचा शाही लग्नसोहळा पार पडला आहे. गुलाबी रंगाच्या भरजरी साडीमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसत आहे. या साडीवर साजेसा असा खास लूक तिनं केला होता. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तेजस्विणीने लग्नात परिधान केलेल्या मंगळसूत्राची खूप चर्चा आहे.
समाधान यांनी विधीनुसार तेजस्विणीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आकर्षक डिझाईन असलेलं तेजस्विणीचं हे मंगळसूत्र चर्चेत आहे. तेजस्विणीचे मंगळसूत्र पारंपरिक पद्धतीचे आहे. जाड्या मण्यांचं हे मंगळसूत्र खूप आकर्षक आहे. या मंगळसूत्राला सोन्यांनी मढवलेल्या दोन मोठ्या वाट्या आहेत. मंगळसूत्रातील वाट्या हे शिव-शक्तीचे प्रतीक मानले जातात आणि त्या सौभाग्य चिन्हाचे प्रतीक असतात. या दोन वाट्यांमुळे मंगळसूत्राचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे. पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेल्या तेजस्विनीच्या या मंगळसूत्राची डिझाईन आता अनेकांसाठी नवीन ट्रेंड सेट करणारी ठरली आहे.
तेजस्विनी आणि समाधान यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. या नवविवाहित जोडीवर सध्या कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याचे फोटो बरेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनी तेजस्विनी लग्नबंधनात अकडली आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत.