"चालताही येत नव्हतं, आत्महत्येचे आले विचार...", अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:48 IST2024-12-31T10:47:36+5:302024-12-31T10:48:19+5:30
कुरळ्या केसांची ही अभिनेत्री कुठे गायब झाली?

"चालताही येत नव्हतं, आत्महत्येचे आले विचार...", अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था; म्हणाली...
अभिनेत्री तनाज ईरानी (Tanaaz Irani) हिंदी मालिका, सिनेमामुळे सर्वांनाच परिचीत आहे. कुरळ्या केसांच्या या अभिनेत्रीने तिची वेगळी ओळख बनवली. पण सध्या तनाज ईरानी स्क्रीनवरुन गायब आहे. २०२१ पासून तब्येतीच्या कारणांमुळे ती त्रस्त आहे. बराच काळ ती व्हीलचेअरवरही होती. नुकतंच एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला.
हॅबिट पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तनाज ईरानी म्हणाली, "२०२१ मे मला चालायलाही त्रास होत होता. हा केवळ वाईट काळ असेल किंवा माझं वजन वाढल्यामुळे असं होत असेल असं मला वाटत होतं. मी डॉक्टरांकडे जायचा विचारच करत होते. नंतर मला पाठीचं दुखणंही सुरु झालं. मला वाटलं मणक्यातच प्रॉब्लेम असावा. तीन वर्ष मी उपचार करत होते."
ती पुढे म्हणाली, "माझी पाठ तर बरी झाली पण मी अजूनही पायावर वजन टाकू शकत नाही. लंगडतंच चालावं लागत होतं. मी एमआरआयही काढला. पण तोवर सगळंच संपलं होतं. खूप वाईट परिस्थिती झाली होती. परदेशात सुट्टी घालवत असतानाही मी व्हीलचेअरवर होते. संध्याकाळी बाहेरुन आल्यावर मी वेदनेत विव्हळतच घरी यायचे. मी नेहमी पेनकिलरवरच होते."
शेवटी माझी हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली. सर्जरीनंतर जेव्हा मी उभी राहिले तेव्हा मला वाटलं की एक पाय दुसऱ्या पायापेक्षा मोठा आहे आणि मी खूप घाबरले. मी जोरात किंचाळले. मला आता आयुष्यभर असंच चालत राहावं लागणार आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीए. मला जगायचीही इच्छा नव्हती."