६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:28 IST2025-07-29T09:27:34+5:302025-07-29T09:28:01+5:30
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत दयाबेन सहा वर्षांपासून दिसत नाहीये. त्याविषयी जेठालालने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे

६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले-
'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. २८ जुलै रोजी 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेला तब्बल १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मालिकेच्या टीमसाठी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. याशिवाय पत्रकार परिषदे सुद्धा झाली. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी गेल्या सहा वर्षांपासून मालिकेत दिसत नाहीये. याविषयी विचारलं असता जेठालाल अर्थात दिलीप जोशींनी त्यांची खास प्रतिक्रिया दिली आहे.
'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, जेठालाल म्हणाला
२०१७ साली 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील दयाबेन गरोदरपणामुळे मॅटर्निटी लिव्हवर गेली. तिच्याजागी अजूनपर्यंत मेकर्सने कोणालाच दयाबेनच्या भूमिकेत कास्ट केलं नाही. यावेळी मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशींना याविषयी विचारलं असता त्यांनी इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच याबद्दल प्रतिक्रिया दिली. दिलीप म्हणाले की, "आम्ही २००८ ते २०१७ पर्यंत काम केलं. त्यामुळे मी त्यांना खूप मिस करतो, हे खरंय. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केल्यामुळे अनेक आयकॉनिक सीन दिले."
"आम्ही दोघांनी रंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्यातील केमिस्ट्री खूप चांगली होती. एक सहकलाकार म्हणून मी त्यांना खूप मिस करतो. कारण जेव्हा आमचे एकत्र सीन असायचे तेव्हा आम्ही खूप मजा करायचो." याच मालिकेत दिशा वकानी खऱ्या आयुष्यातील भाऊ मयुर वकानी सुंदरची भूमिका साकारली. दिशा वकानीविषयी मयुर म्हणाला की, "मी लहानपणापासून माझ्या बहिणीसोबत काम करतोय. सध्या ती या शोमध्ये नाहीये. मी माझ्या बहिणीला खूप मिस करतो. प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलंय, त्याविषयी मी खूप आभारी आहे."