सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:14 IST2024-02-09T14:13:34+5:302024-02-09T14:14:13+5:30
Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून या मालिकेची महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडणार आहेत.

सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु आहे. यात अनेक नवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या आगामी मालिकेची चर्चा रंगली आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रेश्मा शिंदे (reshma shinde) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' या गाजलेल्या सिनेमातील एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलिकडेच 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा प्रोमो समोर आला. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे याच मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (suchitra bandekar) पुन्हा छोट्या पडद्यावर काम करणार आहेत. मात्र, त्या पडद्यावर झळकणार नसून पडद्याच्या मागे काम करणार आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची निर्मिती सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेसोबतच त्या ठरलं तर मग या मालिकेचीही निर्मिती करत आहेत. ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आता त्यांची नवी मालिका कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, सुचित्रा यांच्या या आगामी मालिकेत रेश्मा शिंदे जानकी हे मुख्य पात्र साकारणार आहे. मात्र, तिच्यासोबत अन्य कोणते कलाकार स्क्रीन शेअर करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.