​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 12:29 IST2018-05-07T06:59:35+5:302018-05-07T12:29:35+5:30

टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीने याचा प्रत्यक्ष ...

The star of 'Star Rally' gives the desire to get rid of the gold necklace | ​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

व्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीने याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेने प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला. सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही दिली. 
स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेसाठी एक कॉन्टेस्ट घेण्यात आले होते. या कॉन्टेस्टमध्ये अचूक उत्तर देणाऱ्याला छोटी मालकिणीला मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या कॉन्टेस्टला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात नंदूरबारची प्रीती नांद्रे भाग्यवान विजेती ठरली. 
'छोटी मालकीण' ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीर झाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचे ठरवले आणि उत्तर दिले. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हार मिळणे हे माझ्यासाठी खरोखरच प्लेझंट सरप्राईज आहे. हा आनंद मला मिळवून दिल्याबद्दल छोटी मालकीणचे आभार मानावेसे वाटतात,' अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली.  
‘छोटी मालकीण’च्या या पुढच्या कॉन्टेस्टचे तुम्हीही विजेते ठरू शकता, त्यासाठी छोटी मालकीण मालिका स्टार प्रवाहवर पाहून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. 
छोटी मालकीण ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेची कथा, व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. या मालिकेत अक्षर कोठारी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहे तर एतशा संझगिरी या मालिकेत छोटी मालकीण ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचसोबत या मालिकेचे शीर्षक गीत देखील लोकांनी खूपच आवडत आहे. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नाते सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. 

Also Read : ​​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'मध्ये वर्षा दांदळे करणार एंट्री

Web Title: The star of 'Star Rally' gives the desire to get rid of the gold necklace