‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’च्या सीझन ३ सह सोनी मॅक्स2 चे पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:48 IST2018-03-22T07:18:12+5:302018-03-22T12:48:12+5:30
सोनी मॅक्स2 ‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’ आपल्या तिसऱ्या सीझनसह परत येत असून हिंदी चित्रपटसृष्टीच्या आतापर्यंतच्या सदाबहार आणि आठवणीतील युगासह प्रेक्षकांचा ...
.jpg)
‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’च्या सीझन ३ सह सोनी मॅक्स2 चे पुनरागमन
स नी मॅक्स2 ‘टाईमलेस डिजीटल अवॉर्ड्स’ आपल्या तिसऱ्या सीझनसह परत येत असून हिंदी चित्रपटसृष्टीच्या आतापर्यंतच्या सदाबहार आणि आठवणीतील युगासह प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करणार आहे.५० आणि ६० च्या ‘सदाबहार’ दशकाने अनेक नावाजलेले कलाकार दिले,अनेक प्रेरणादायी कलाकृती निर्माण केल्या.असे कलाकार आणि असे सिनेमे जे सामाजिक प्रश्नांशी झगडणाऱ्या सामान्य माणसाचा आवाज होते, रोमान्स आणि गाण्यांमधून रसिकांना आकर्षित करणारे पात्र होते, भावभावना मांडणाऱ्या कथा होत्या.सोनी मॅक्स2 भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या दिवसांना आदराने सन्मानित करून या गौरवशाली युगाचे स्मरण करत आहे.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल अवॉर्ड्समध्ये वर्षानूवर्षे प्रगती होत आहे.पहिल्या वर्षी ऐंशी हजार प्रेक्षकांनी मतदान केले होते, तर दुसऱ्या वर्षात ही संख्या वाढून चार लाखांवर गेली.आता तिसऱ्या वर्षी सहभागी होणाऱ्यांचे संपूर्ण वेळ ऑनलाईन नव्या श्रेणी आणि मजा घेत मनोरंजन होणार आहे. या वर्षी चॅनेल टाईमलेस डिजिटल अवॉर्ड्स सीझन ३ मध्ये #IndiaKiShaan करिता हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा घडलेल्या अनेक गोष्टी साजरे करणार आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी,प्रेक्षकांना आपल्या योग्य ईमेल आयडी,फेसबुक वा ट्विटरच्या माध्यमातून मायक्रोसाईटवर लॉग इन करावे लागेल.खास तयार करण्यात आलेल्या https://max2awards.sonyliv.com/ या वेबसाइटच्या माध्यमातून डिजीटल अवॉर्ड्स घेण्यात येणार असून चाहत्यांना सदाबहार चाईल्ड आर्टिस्ट,सदाबहार अभिनेता, सदाबहार अभिनेत्री, सदाबहार दिग्दर्शक, सदाबहार विनोदी अभिनेता, सदाबहार थ्रिलर, सदाबहार संगीत दिग्दर्शक,सदाबहार प्रेम कहाणी, सदाबहार एपिक्स, सदाबहार क्रिटिक्स आणि सदाबहार स्टार अशा अकरा (११) श्रेणींमध्ये मत देण्याची संधी मिळणार आहे.२० मार्चपासून मत देण्यासाठी लाईन्स सुरू होणार असून अंतिम तारीख ७ एप्रिल २०१८ अशी आहे.मताधिक्याच्या आधारे सर्व श्रेणीतील विजेत्यांचे परीक्षण करण्यात येईल आणि वाहिनीच्या सर्व सोशल मीडिया पेजवर डिजीटल वॉल ऑफ फेमने त्यांना सन्मानित करण्यात येईल.
मायक्रोसाईटवर चाहत्यांकडून मतांचा पाऊस पडत असतानाच, प्रेक्षकांना #TimelessTales page वर ५० आणि ६० च्या दशकातील चित्रपटांसंदर्भात सर्व माहिती वाचता येईल आणि जुन्या आठवणींना उजाळा देता येईल.इतकेच नाही तर,आजच्या पिढीला लक्षात ठेऊन मात्र जुन्या जमान्यातील गंध तसाच ठेऊन, सोनी मॅक्स2 एक असे व्यासपीठ घेऊन येत आहे जिथे फॅशन आणि आयकॉन्सची भेट घडू शकेल.त्या दशकातील #SadabaharLook निर्माण करण्यासाठी आजच्या फॅशन जगतातील तज्ज्ञांसह चॅनेलने हातमिळवणी केली आहे. याव्यतिरिक्त, चाहत्यांसाठी सर्वसमावेशक स्वरुपात चॅनेलच्या SadabaharScope द्वारे त्या दशकातील क्षण समोरासमोर पाहण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया :वैशाली शर्मा, वरीष्ठ व्हीपी, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स, मॅक्स2:
“भारतीय चित्रपटीसृष्टीतील महानता आणि श्रीमंती साजरी करण्यावर सोनी मॅक्स2 चा नेहमीच विश्वास राहिला आहे. टाईमलेस डिजिटल अवॉर्ड्स हे त्या मार्गाकडे जाण्यासाठी उचललेले एक नवे पाऊल आहे.पहिल्या दोन सीझनचे यश बघून, सीझन ३ आणण्याची आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीचे साक्षीदार बनून ५० आणि ६० चे दशक साजरे करण्याची हीच योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या दशकाला विशेष स्थान आहे आणि भारताची ही कला परत आम्ही घेऊन येत आहोत असा आम्हाला विश्वास आहे. ऑफस्क्रीन चाहते आणि फॉलोअर्स यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोरंजन
करण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी होऊन टाईमलेस डिजिटल अवॉर्ड्सला अजून एक यशस्वी वर्ष बनवतील,अशी आम्हाला आशा आहे.”
नया दौर की मदर इंडिया? तुम्ही कोणाकरिता तुमचे मत देणार? ऑनलाईन या, तुमचे मत द्या आणि तुमच्या आवडत्या ‘सदाबहार’ स्टार्सना वॉल ऑफ फेमवर पाहा कारण हे फक्त चित्रपटच नाहीत, तर भारताची शान आहेत.