​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सच्या मंचावर सोनू के टिटू की स्वीटीच्या टीमने लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:41 IST2018-01-31T07:11:12+5:302018-01-31T12:41:12+5:30

स्टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत ...

Sonu ki Titu ki sweety team lavali hajeri on stage of India's Next Superstars | ​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सच्या मंचावर सोनू के टिटू की स्वीटीच्या टीमने लावली हजेरी

​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सच्या मंचावर सोनू के टिटू की स्वीटीच्या टीमने लावली हजेरी

टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमामुळे सामान्य लोकांना अभिनय क्षेत्रातील त्यांची अतिशय दुर्मिळ अशी स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यक्रमाते फॉरमॅट हे इतर रिअॅलिटी शो पेक्षा वेगळे असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या कार्यक्रमात करण जोहर आणि रोहित शेट्टी परीक्षकाची भूमिका साकारत असून ते सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत. इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या रिअ‍ॅलिटी शो मध्ये स्पर्धकांना सुपरस्टार की पाठशाला या अकादमीत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाते. या अकादमीत या स्पर्धकांना काही कामे करण्यास सांगितली जातात आणि त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शनही मिळते. या पाठशाळेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील कार्तिक आर्यन, सनी सिंह आणि नुशरत भरूचा या प्रमुख कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली होती. आजच्या तरुणांचे लाडके अभिनेते असलेल्या या कलाकारांनी या स्पर्धकांबरोबर भरपूर धमाल तर केलीच. पण त्याचसोबत त्या स्पर्धकांना कोणत्याही गोष्टीवर लगेचच अभिनय करण्याचे (स्पॉट लाइट चॅलेंज) आव्हान दिले. हे कलाकार सांगणार त्याप्रमाणे स्पर्धकांना अभिनय, नृत्य करायचे होते. नुशरतने लेखा आणि अँजेला या दोन स्पर्धकांना कार्तिक आणि सनी सिंह यांच्यासोबत नृत्य करण्याचे आणि त्यातून मस्करी, मादकता आणि तिरस्कार या तीन भावना व्यक्त करण्याचे आव्हान दिले. लेखा आणि अँजेला यांनी आपल्यावरील जबाबदारी अचूकतेने पार पाडत उत्कृष्ट नृत्य सादर केले. विशेषत: लेखाने कार्तिकबरोबर केलेल्या मादक नृत्याने सर्वांचे लक्ष तर वेधून घेतलेच, पण त्यांची प्रशंसाही मिळविली. 
‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक अभिनयात सरस असल्याने या सगळ्यातून बाजी कोण मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात आजवर प्रियांका चोप्रा, कंगना राणौत यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. 

Also Read : कंगणा राणौतला का आठवण आली त्या दिवसाची?

Web Title: Sonu ki Titu ki sweety team lavali hajeri on stage of India's Next Superstars