झी मराठीवर सुरु होणारी नवी मालिका 'शुभ श्रावणी' 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक, प्रेक्षक म्हणतात-
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:17 IST2025-12-10T12:16:33+5:302025-12-10T12:17:36+5:30
झी मराठीवर लवकरच 'शुभ श्रावणी' ही मालिका सुरु होणार आहे. ही मालिका एका गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे

झी मराठीवर सुरु होणारी नवी मालिका 'शुभ श्रावणी' 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक, प्रेक्षक म्हणतात-
काही दिवसांपूर्वी झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर 'शुभ श्रावणी' या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला. या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी मात्र ही मालिका रिमेक आहे हे लगेच ओळखलं. मालिकेच्या प्रोमोखाली प्रेक्षकांनी तशा कमेंट केल्या आहेत. जाणून घ्या.
या मालिकेचा रिमेक आहे 'शुभ श्रावणी'
वल्लरी विराजची प्रमुख भूमिका असलेली 'शुभ श्रावणी' ही मालिका झी टीव्हीवरील एका जुन्या मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेचं नाव म्हणजे 'दो दिल बंधे एक डोरिसे'. ही मालिका २०१३ रोजी झी टीव्हीवर प्रसारित झाली होती. या मालिकेचं कथानक आणि 'शुभ श्रावणी'चं कथानक सारखंच असणार आहे. मराठी मालिकेच्या गरजेनुसार कथेत आवश्यक ते बदल केले जातील.
'शुभ श्रावणी' मालिका सुरु झाल्यावर ही मालिका प्रेक्षकांचं प्रेम कसं जिंकणार याची सर्वांना उत्सुकता आहे. प्रेक्षकांना मालिकेचा प्रोमो आवडला असून वल्लरीला पुन्हा वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
लोकेश गुप्तेचं ९ वर्षांनी मालिकेत कमबॅक
या मालिकेच्या निमित्ताने मराठी अभिनेता लोकेश गुप्ते तब्बल ९ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. मधल्या काळात लोकेशने काही सिनेमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. पण आता मात्र लोकेशला ९ वर्षांनी मालिकाविश्वात अभिनय करताना पाहण्यास त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. त्यामुळे 'शुभ श्रावणी' मालिकेची सुरु होण्याआधीच चांगलीच चर्चा आहे.