शिवची एक झलक पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत; VIdeo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:01 PM2023-02-15T12:01:09+5:302023-02-15T12:01:22+5:30

अमरावतीचा वाघ शिव ठाकरेने बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

shiv thakre reach in hometown Amravati fans gather to catch a glimpse of Shiv | शिवची एक झलक पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत; VIdeo व्हायरल

शिवची एक झलक पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी, ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत; VIdeo व्हायरल

googlenewsNext

अमरावतीचा वाघ शिव ठाकरेने बिग बॉसमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मराठी 'बिग बॉस २' चे विजेतेपद नावावर करताच काही दिवसातच त्याने हिंदी बिग बॉसमध्येही एंट्री घेतली. आपल्या साध्या सरळ आणि वेळ पडेल तेव्हा रोखठोक वागण्यामुळे त्याने हिंदी प्रेक्षकांचेही मन जिंकले आहे. इतकंच नाही तर  'बिग बॉस १६' मध्येही अंतिम फेरीपर्यंत बाजी मारत तो रनर अप ठरला. यानंतर शिवचे अमरावतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 बिग बॉस मध्ये 'शिव ठाकरे', 'एमसी स्टॅन' आणि 'प्रियांका चहर चौधरी' यांच्यात शर्यत होती. जेव्हा प्रियांका टॉप २ च्या रेसमधून बाहेर पडली तेव्हा शिवच विजेता होणार असंच प्रत्येकाला वाटलं होतं. शिव ठाकरे भले ही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही पण त्याने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिव नुकताच त्याच्या गावी अमरावतीला पोहोचला आहे. सुरुवातीला नागपूर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर नंतर अमरावतीत पोहोचल्यावर अमरावतीकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. शिवच्या स्वागतासाठी ढोल ताशा वाजवत आनंद साजरा करण्यात आला. सर्वच लोक शिव शिव नाव घेत ओरडत होते. शिवनेही इतकं प्रेम बघून सर्वांचे आभार मानले. अमरावतीतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'बिग बॉस' फिनाले झाल्यानंतर दिग्दर्शिका फराह खानच्या (Farah Khan) घरी आफ्टर पार्टी झाली. यावेळी 'शिव ठाकरे', 'निमृत कौर आहलुवालिया' आणि 'प्रियांका चहर चौधरी' यांनी हजेरी लावली. तर 'सलमान खान'ही आफ्टर पार्टीत सहभागी झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिथून निघाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मराठमोळ्या शिवचे सलमान खाननेही अनेकदा कौतुक केले आहे. आता तर शिवला रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' चीही ऑफर मिळाली आहे. 

Web Title: shiv thakre reach in hometown Amravati fans gather to catch a glimpse of Shiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.